Sharad Pawar Gram Samruddhi Yojna Maharashtra 2022

Sharad Pawar Gram Samruddhi Yojna Maharashtra 2022

भारत हा कृषीप्रधान देश आहे. येथे बहुतेक राज्यात शेती हा प्राथमिक व्यवसाय केला जातो. महाराष्ट्र हा यातीलच एक! महाराष्ट्रात शेती व शेतकऱ्यांचा विकास व्हावा यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार कायम प्रयत्नशील असते. यासाठी त्यांच्या मार्फत विविध योजनांची अंमलबजावणी देखील केली जाते. शरद पवार ग्राम समृद्धी योजना/ Sharad Pawar Gram Samruddhi Yojna यातलीच एक महत्त्वाची योजना आहे. ही योजना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त २०२१ मध्ये सुरू करण्यात आली.ग्राम भागांचा आणि शेतकऱ्यांचा विकास व्हावा, ग्राम नागरिकांना वैयक्तिक आणि सार्वजनिक कामांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी महाराष्ट्र सरकारने ( Maharashtra Goverment) ही योजना सुरू केली होती.

Benifits of Sharad Pawar Gram Samridhi Yojana | असा होणार फायदा

शरद पवार ग्राम समृद्धी योजना २०२२ साठी शेतकऱ्यांना विविध कामांसाठी अनुदान मिळेल महाराष्ट्रातील ग्राम भागातील नागरिक याचे लाभार्थी होऊ शकतात. कुक्कुट पालन किंवा पोल्ट्री शेड बांधणे, शेळयांसाठी शेड बांधणे, भू-संजीवनी नाडेप कंपोस्टिंग, गाई आणि म्हशींसाठी पक्का गोठा बांधणे या कामांसाठी लाभार्थ्यांना अनुदान देण्यात येणार आहे. विहिरी, दुष्काळी भागात पाणी पुरवठा, तबेले बांधणे, गावातील रस्ते बांधणे ही कामे देखील या योजनेअंतर्गत केली जाणार आहेत.

Sharad Pawar Gram Samruddhi Yojna तील अनुदान देणारे महत्त्वाचे उपक्रम | Subsidy

१) गाय गोठा अनुदान (Gay Gotha Anudan) –

ग्राम भागात शेतकरी शेतीव्यवसायला जोडधंदा म्हणून पशुपालन करतात. यामध्ये गायी- म्हशींचे मोठ्या प्रमाणावर पालन केले जाते.  या योजनेअंतर्गत गायी म्हशींच्या गोठ्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. यामध्ये एका गोठयासाठी ७७ हजार १८८ रुपये खर्च येईल. २ ते ६ गुरांसाठी एक गोठा व त्यानंतर अधिक गुरांसाठी ६ च्या पटीत म्हणजे १२ गुरांसाठी दुप्पट आणि १८ गुरांपेक्षा जास्त गुरांसाठी तीन पट गोठा बांधणी अनुदान देण्यात येईल.

२) कुक्कुटपालन :

कुक्कुटपालन हा शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न देणारा एक उत्तम व्यवसाय आहे. या व्यवसायातून रोजगार निर्माण व्हावा व शेतकऱ्यांचा विकास व्हावा यासाठी कुक्कुटपालनासाठी किंवा पोल्ट्री शेड बांधण्यासाठी सरकारकडून शरद पवार ग्राम समृद्धी योजने अंतर्गत अनुदान देण्यात येणार आहे. पक्ष्यांची संख्या आणि जागा यावर अनुदान अवलंबून असणार आहे. ते जवळपास 49 हजार 760 रुपये इतके असेल.

3)शेळ्यांसाठी शेड बांधणे –

ग्राम भागात शेळ्यांसाठी योग्य निवारा नसल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी सरकारकडून शेळ्यांसाठी शेड बांधण्यासाठी देखील 49 हजार 284 रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

Features | शरद पवार ग्राम समृद्धी योजनेची वैशिष्ट्ये

१) ही योजना शरद पवार यांच्या जन्मदिनी म्हणजेच १२ डिसेंबर २०२० पासून सुरू करण्यात आली आहे.

२) या योजनेतून ग्राम भागातील नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

३) ग्राम समृद्धी योजनेच्या माध्यमातून जमिनीचा दर्जा सुधारण्यास मदत होईल.

४)ग्राम भागात मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही.

५) ग्राम भागातील बेरोजगारी कमी होईल.

६)या योजनेतील लोक सहभागामुळे गावांच्या अर्थव्यवस्था सुधारतील

शहरी भागातील स्थलांतर रोखले जाईल

गाव हे देशाच्या विकासाचे महत्त्वाचे एकक आहे. म्हणूनच ग्राम भागातील विकासासाठी सरकार देखील आपली पाऊले उचलत आहे. शरद पवार ग्राम विकास समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश  ग्राम विकास हाच असून यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती ( employment) होणार आहे. ग्राम भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिल्याने आर्थिक विकास (Economical development in villages) होईल. यामुळे ग्राम भागातून शहरी भागात होणारे स्थलांतर कमी प्रमाणात पहायला मिळेल.

Important Documents| आवश्यक कागदपत्रे

शरद पवार ग्राम समृद्धी योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्राम हमी योजनेच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रभर राबवली जाणार आहे. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

१)आधार कार्ड

२)रेशन कार्ड

३)रहिवासी दाखला

४)पासपोर्ट आकाराचा फोटो

५) मोबाईल क्रमांक

६)उत्पन्नाचा दाखला

७) मतदार ओळखपत्र

Online registration for Sharad Pawar Gram Samridhi Yojana | अर्ज प्रक्रिया

सरकारने शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 मध्ये अर्ज करण्यासाठी अद्याप कुठलीही अधिकृत माहिती दिली नसून याची माहिती देणारे ऑनलाइन संकेतस्थळ ( Online website) सुद्धा उपलब्ध नाही. या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवाराला काही काळ थांबावे लागणार आहे. याची अर्जप्रक्रिया लवकरच जाहीर होईल. इच्छुक व्यक्तींनी आपल्या ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या संपर्कात राहिल्यास वेळोवेळी सूचना मिळतील.

Question And Answers | प्रश्न तुमचे उत्तर आमचे

शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा अर्ज कुठे उपलब्ध होईल ?

– सरकारच्या जीआर व्यतिरिक्त या योजनेची कोणतीही माहिती अधिकृत संकेतस्थळावर टाकण्यात आली नसून यासाठी नागरिकांनी ग्रामपंचायत व पंचायत समिती यांच्या संपर्कात रहावे.

शरद पवार ग्राम समृद्धी योजनेतून किती अनुदान मिळते ?

– शरद पवार ग्राम समृद्धी योजनेच्या प्रत्येक उपक्रमासाठी वेगवेगळे अनुदान मिळते.

१) गाय गोठा अनुदान – ७७ हजार १८८ रुपये.

२) शेळ्यांसाठी शेड बांधणे – ४९ हजार २८४ रुपये.

३)पोल्ट्री शेड बांधणे – ४९ हजार ७६० रुपये.

शरद पवार ग्राम समृद्धी योजना मनरेगाशी जोडली आहे का ?

– हो, ही योजना मनरेगा सोबत संलग्न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

योजनेसाठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

– आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो,  मोबाईल क्रमांक, उत्पन्नाचा दाखला, मतदार ओळखपत्र.

सरकार दरवर्षी नवनवीन योजनांची अंमलबजावणी करते. या लेखातून आम्ही तुम्हाला नवीन Sharad Pawar Gram Samruddhi Yojna याची माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. या सारख्याच नवनवीन आणि उपयुक्त योजनांचा लाभ घेण्याकरिता https://schemeofgovernment.com/ या संकेतस्थळाला अवश्य भेट देत राहा.

Sharing Is Caring

Leave a Comment