आता मुली आणणार ‘ भाग्य ‘ !! जाणून घ्या Mazi Kanya Bhagyashri Yojana

आता मुली आणणार ‘ भाग्य ‘ !! जाणून घ्या Mazi Kanya Bhagyashri Yojana 

राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी यांसारख्या कर्तृत्ववान स्त्रियांच्या महाराष्ट्रात आजही वंशाला दिवा हवा म्हणत वंशाच्या ज्योतीला अनेक गोष्टींपासून उपेक्षित ठेवले जाते ; मग ती समानता असो , शिक्षण असो आणि अगदी जगण्याचा, जन्माला येण्याचा हक्क असो, मुलींना नेहमी दुय्यम वागणूक मिळत आली आहे. बाळ जन्माला येण्याआधीच गर्भलिंगनिदान चाचणी करून, मुलगी असल्याचे समजल्यावर तिला गर्भातच मारून टाकण्यात येते, तिचा जगण्याचा अधिकारच हिरावून घेतला जातो. याचे दूरगामी परिणाम समाजावर दिसून यायला सुरुवात झाली , यापैकी एक म्हणजेच घटलेले लिंग गुणोत्तर प्रमाण.

आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाने मुलींचे शिक्षण , आरोग्य यांमध्ये सुधारणा करण्यासाठी , त्याचबरोबर स्त्रीभ्रूणहत्येला प्रतिबंध करत , स्त्रियांचे एकंदर सामाजिक स्थान उंचावण्यासाठी  महिला धोरणाद्वारे अनेक योजना राबविण्यात येत आहेत . यापैकी एक योजना म्हणजे ‘सुकन्या’ योजना . केंद्र सरकारच्या ‘ बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेच्या उद्दिष्टांसोबत मेळ साधत, सुकन्या योजना विलीन करत , माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आली.  या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट मुलींच्या जन्माप्रति लोकांच्या मनात सकारात्मक विचार निर्माण करणे व मुलींच्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे ही आहेत. प्रस्तुत योजनेच्या माध्यमातून, राज्यातील सर्व दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील पांढरे रेशनकार्ड धारक कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलींना Mazi Kanya Bhagyashri Yojana लाभ मिळणार आहे. एक ऑगस्ट २०१७ नंतर जन्माला आलेल्या मुलींना याचा लाभ मिळणार आहे.

माझी कन्या भागयश्री योजना साठीची पात्रता

प्रस्तुत योजनेच्या प्रमुख अटींपैकी मध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो .

१. एकुलती एक मुलगी आहे व मातेने कुटुंबनियोजन केले आहे

२.दोन मुली व दुसऱ्या मुलीच्या जन्मनंतर कुटुंबनियोजन केले आहे .

३. एक मुलगा व एक मुलगी असल्यास योजनेला पात्र ठरणार नाही.

या योजनेचा आर्थिक लाभ मुलीच्या वयाच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर मिळत जाईल अशी तरतूद करण्यात आली आहे. योजेअंतर्गत मिळणारी रक्कम जमा करण्यासाठी आई व मुलीच्या नावे, प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत संयुक्त बचत खाते उघडण्यात येईल. त्यामुळे प्रधानमंत्री जनधन खात्याचे सर्व फायदे, जस की १ लाख अपघात विमा याचाही लाभ घेता येईल. 

याचबरोबर सरकार मुलींच्या जीवनमानाचा सुरक्षेसाठी बालिकेच्या नावे एल आय सी कडे २१,२०० रुपयांचा विमा उतरविण्यात येईल , ज्याची परत मुलगी १८ वर्षांची झाल्यावर रुपये १ लाख एवढी मिळेल. त्याचबरोबर, प्रस्तुत खात्यातील रकमेद्वारे, केंद्र सरकारच्या आम आदमी योजनेतही गुंतवणुक करण्यात येईल, ज्यातून मुलीच्या पालकांचा अपघात/मृत्यू झाल्यास तिच्या जीवनात अडथळा येऊ नये म्हणून काही रक्कम तिला देण्यात येईल . याच आम आदमी योजनेअंतर्गत मुलीच्या शिक्षणासाठी इयत्ता नववी ते अकरावीच्या सहा महिन्यात रुपये ६०० एवढी शिष्यवृत्ती देण्यात येईल.

Mazi Kanya Bhagyashri Yojana अंतर्गत मिळणारे फायदे 

1. मुलीच्या जन्माच्या वेळी जन्मनोंदणी करून झाल्यावर रुपये ५००० खात्यात जमा करण्यात येतील. याचा उद्देश मुलीच्या जन्माचे स्वागत करणे व ‘ ती ‘ च्या जन्माबद्दल सकारात्मक दृष्टिकोन बनवणे हा असेल.

2. त्यानंतर मुलगी ५ वर्षांची होईपर्यंत प्रत्येक वर्षी २००० रुपये तिच्या सकस आहाराची काळजी घेण्यासाठी मिळतील. दोन मुली असल्यास प्रत्येकीला १००० एवढा लाभ मिळेल.

3. यापुढील टप्पा म्हणजे प्राथमिक शिक्षण. प्राथमिक शाळेतील प्रवेश व इतर खर्चासाठी इयत्ता पहिली ते पाचवी दर वर्षी २,५०० रूपये खात्यात जमा केले जातील. ५ वर्षांच्या शेवटी मुलीच्या खात्यात १२,५०० रुपये जमा होतील. २ मुली असल्यास प्रत्येकी १,५०० प्रतीसाल प्रमाणे ५ वर्षांनंतर एकूण १५,००० रुपये जमा होतील. 

4. त्यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी इयत्ता सहावी ते बारावी रुपये ३००० प्रती वर्ष असा एकूण २१,००० रुपयांचा लाभ मुलीला देण्यात येईल. २ मुली असल्यास प्रत्येकी २,००० व एकूण २२,००० रुपये देण्यात येतील .

5. अशाप्रकारे मुलगी १८ वर्षांची झाल्यावर तिला विम्याचा कालावधी पूर्ण होऊन रुपये १ लाख देण्यात येतील , ज्यापैकी किमान दहा हजार रुपये मुलीच्या कौशल्य विकास व उच्च शिक्षणासाठी खर्च करणे बंधनकारक राहील

Mazi Kanya Bhagyashri Yojana अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Mazi Kanya Bhagyashri Yojana चे नियम व अटी 

योजनेचे मिळणारे सर्व लाभ मिळण्यासाठी वेळोवेळी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. जन्माच्या वेळी जन्मनोंदणी तर ५ वर्षापर्यंतचा लाभ घेण्यासाठी मुलीचे लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक राहील. त्याचबरोबर प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी मिळणारा लाभ घेण्यासाठी शाळा प्रवेशपत्र आणि उपस्थिती प्रमाणपत्राची गरज आहे. मुलगी १८ वर्षांची झाल्यावर मिळणाऱ्या विम्याच्या परतव्यासाठी तिने इयत्ता दहावी उत्तीर्ण होणे व १८ वर्ष पूर्ण होई पर्यंत अविवाहित असणे आवश्यक आहे. याचा उद्देश बालविवाह रोखणे व सर्व मुलींना इयत्ता बारावी पर्यंतचे शिक्षण मिळावे हा आहे. जर एका घरात एका मुलीच्या जन्मानंतर मातेने कुटुंबनियोजन करून घेतले तर,  योजनेच्या विशेष तरतुदींद्द्वारे मुलीच्या जन्माच्या वेळी आज्जी- आजोबांना सोन्याचे नाणे भेट स्वरूपांत देण्यात येते.

त्याच बरोबर एखाद्या गावाचे लिंग गुणोत्तर १००० पेक्षा जास्त असेल तर या समानतेच्या दृष्टिकोनाला प्रोत्साहन देण्यासाठी त्या गावाचा गौरव रुपये ५ लाख देऊन केला जातो. योजनेचा लाभ घेण्यासाठी काही प्रमुख नियम बनविण्यात आले आहेत . त्यापैकी एक म्हणजे मुलीचे वडील महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे. एखाद्या कुटुंबाने अनाथ मुलीला दत्तक घेतले तर ती मुलगी त्या कुटुंबाची पहिली मुलगी समजून तिला सर्व लाभ मिळतील , परंतु दत्तक घेताना तिचे वय ६ पेक्षा कमी असावे .  वयाची १८ वर्षे पूर्ण होण्याआधी मुलीच्या विवाह किंवा मृत्यू झाल्यास या योजनेचा फायदा तिच्या पालकांना न होता , मुलीच्या खात्यातील रक्कम महाराष्ट्र शासनाच्या खात्यात जमा होतील . त्याचबरोबर मुलीच्या नावे असलेल्या विमा खात्यात १ लाख पेक्षा अधिक रक्कम झाल्यास जादाची रक्कम महाराष्ट्र शासनाकडे जमा होईल. योजनेत नमूद केले गेलेले आहार व इतर गोष्टी इतर कोणत्या योजनेतून मिळत असतील तर त्याचा लाभ प्रस्तुत योजनेतून मिळणार नाही

माझी कन्या भागयश्री योजना अंमलबजावणी कार्यपद्धती 

प्रस्तुत योजना राबविण्यासाठी महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य विभाग, शालेय शिक्षण विभाग आदी अनेक सरकारचे घटक एकत्रित काम करणार आहेत. यासोबतच युनिटेड नेशन् पॉप्युलेशन फंड सुद्धा या योजनेत महाराष्ट्र सरकारची सहाय्यता करणार आहे. पंचायत राज संस्था, शहरी स्थानिक समित्या , स्थानिक स्तरावरील कर्मचारी , महिला मंडळे , बचत गट , युवा मंडळ आदी घटकांना सामाजिक बदलाचे प्रभावी माध्यम म्हणून बघितले गेले आणि म्हणूनच त्यांनाही या योजनेच्या प्रसारासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या योजनेचे लाभ मिळण्यासाठी मुलीचा जन्म झाल्यानंतर व जन्म प्रमाणपत्र मिळाल्यावर क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे अर्ज करावा . अर्जासोबत वडिलांचे अधिवास प्रमाणपत्र , रेशन कार्ड/ उत्पन्नाचा दाखला व वैद्यकीय प्रमाणपत्र जोडावे. सदर अर्जांची पडताळणी अंगणवाडी सेविका , पर्यवेक्षक , बाल विकास अधिकारी आदी अधिकाऱ्यांकडून झाल्यावर लाभार्थी यादीला मंजुरी मिळून , लाभार्थ्यांना सर्व लाभ मिळण्यास सुरुवात होईल.

माझी कन्या भागयश्री योजनेची उद्दिष्टे 

माझी कन्या भाग्यश्री ‘ योजना आखताना सरकारने दूरदृषटी वापरात निव्वळ आज जन्माला येणारी मुलींची पिढी नाही तर येणाऱ्या सर्वच पिढ्या सक्षम बनतील याची काळजी घेतली आहे . समाजाची मानसिकता बदलण्यासोबत मुलींना सर्वार्थाने सक्षमस्वावलंबी बनवण्याचा आराखडा म्हणून ही योजना आखली गेली. समाजामध्ये असणारी मुलींच्या जन्माप्रतीची नकारात्मकता दूर करणे, तिच्या जन्माचे स्वागत करणे ही उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मुलीच्या कुटुंबाला प्रोत्सहित करण्याचा प्रयत्न या योजनेमार्फत केला गेला आहे. यामुळे सासू- सासरे , घरातील इतर सदस्य सुनेला मुलासाठी आग्रह न धरता एकच मुली नंतर कुटिंबंनियोजन करण्यास प्रोत्साहन देतील . अशाप्रकारे एकच मुलगी असलेल्या कुटुंबांना समाजातून वाईट बोलणे ऐकू न येता , त्यांचा आदर वाढेल व पर्यायाने मुलीचे , स्त्रीचे समाजातील स्थान सुधारेल .  एक सुदृढ , स्वावलंबी , सुशिक्षित आजची पिढीच भविष्यातील जबाबदार नागरिक बनवू शकते , म्हणूनच सरकार आजच्या पिढीच्या पोषणासाठी काम करीत आहे.

आज भारतीय समाजातील स्त्रिया अनेक क्षेत्रात आघाडीवर काम करताना दिसत आहेत . खेळ , राजकारण , सैन्य , व्यापार , पत्रकारिता , संशोधन यापैकी कोणतेच क्षेत्र स्त्रीने जिंकायचं सोडलं नाही. स्त्रियांचं सक्षमीकरण गांभीर्याने १९७५ नंतर घेण्यात आले . हळू हळू स्त्रिया उच्चशिक्षण घेण्यासाठी , नोकरी करण्यासाठी घराबाहेर पडू लागल्या . परंतु अजूनही भारत व महाराष्ट्रातही बालविवाह, हुंडा , शारीरिक – मानसिक अत्याचार , अल्प वैद्यकीय सेवा यांसारखे प्रश्न सुटले नाहीत. यासाठी सरकारी पातळीवर अनेक प्रयत्न करण्यात आले. यात बेटी बचाओ बेटी पढाओ , बालिका समृद्धी योजना , सुकन्या समृद्धी योजना इत्यादी केंद्र सरकारच्या योजना तर महाराष्ट्र सरकारने मनोधैर्य योजना , एकात्मिक बाल विकास , महिला समुपदेशन केंद्र अशा विविध योजना व प्रकल्पांची सुरुवात केली. या विविध योजनांद्वारे विविध स्तरातील स्त्रियांचे प्रश्न विचारत घेत त्यांच्यावर कायमचे उपाय शोधण्याचा प्रयत्न केला गेला .

काम करणाऱ्या स्त्रियांच्या मुलांकरिता राजीव गांधी पाळणाघर योजना ,  काम करणाऱ्या गर्भवती स्त्रियांना वेतन भरपाई साठी इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना , किशोवयीन मुलींना बालविवाह प्रतिबंधक ज्ञान व संतुलित आहार , आरोग्य याबद्दलचे शिक्षण देणारी किशोरी शक्ती योजना अशा अनेक योजनांच्या माध्यमातून स्त्रियांचं आयुष्य सुखकर बनविण्याचा प्रयत्न सरकार करीत आले आहे . स्त्रियांसाठी योग्य असा समाज , जिथे प्रत्येक स्त्री सुरक्षित व स्वावलंबी असेल , हे स्वप्न सर्वच क्रांतिकारकांनी , संविधांकर्त्यानी बघितले आहे . परंतु सामाजिक बदल निव्वळ सरकारी योजनांनी साध्य होणार नाही , तर त्यात लोकसहभाग महत्त्वाचा घटक आहे. म्हणूनच लोकांनीही सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा देणे तेवढेच गरजेचे आहे. स्त्रियांचा योग्य तो सन्मान करून , त्यांना समानतेची वागणूक देत आपण हे परिवर्तन साध्य करू शकतो . त्याचबरोबर सरकारच्या योजनांबद्दल माहिती घेऊन , त्यात सहभागी होऊन आणि त्याबद्दल जन जागृती करून सरकारला स्त्री सक्षमीकणासाठी मदत करू शकतो . आणि अशाप्रकारे स्त्रियांच्या व पर्यायाने भारताच्या विकासाला हातभार लावण्याचे काम सर्वच नागरिक करू शकतात .आज  स्त्रिया सरकारच्या मदतीने नक्कीच प्रगतीपथावर मार्गक्रमण करीत आहेत , म्हणूनच म्हणावसं वाटत ,

” आजच्या युगाची प्रगती तू , प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू “

प्रश्न आणि उत्तर 

१. Mazi Kanya Bhagyashri Yojana साठी अर्ज कसा करावा?

उत्तर: माझी कन्या भागयश्री योजनेचा अर्ज मुलीच्या जन्मानंतर जन्मनोंदणी केल्यानंतर करता येईल. प्रस्तुत अर्ज प्रभागाच्या अंगणवाडी सेविकांकडे उपलब्ध असेल. या अर्जाची विविध स्तरांवर पडताळणी झाल्यावर अनुदान दिले जाईल. 

२. माझी कन्या भागयश्री योजनेची सुरवात कधी झाली?

ही योजना २०१६ मध्ये सुरू करण्यात आली. 

३. माझी कन्या भागयश्री योजनेचा लाभ मिळण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचा जन्मदाखल, वडिलांचे अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखल किंवा रेशन कार्ड, आईने कुटुंबनियोजन केल्याचे प्रमाणपत्र ही कागदपत्रे व अर्ज सादर करावा लागतो. 

या लेखातून आम्ही तुम्हाला नवीन Mazi Kanya Bhagyashri Yojana  याची माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. या सारख्याच नवनवीन आणि उपयुक्त योजनांचा लाभ घेण्याकरिता https://schemeofgovernment.com/ या संकेतस्थळाला अवश्य भेट देत राहा.

Sharing Is Caring

Leave a Comment