महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2022 | Online Registration Process

Contents hide

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना

नमस्कार मंडळी, आज आपण राज्यातल्या अत्यंत महत्वाच्या सरकारी आरोग्यविषयक योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत. या आरोग्यविषयक योजनेचे नाव आहे, “महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना”! आपले सरकार राज्यातील गरीब आणि गरजू जनतेपर्यंत निःशुल्क आरोग्यविषयक सुविधा पुरविण्यासाठी नेहमीच तत्पर असते. मात्र, या मोफत आरोग्य विषयक योजनेची माहिती आपल्याला त्वरित कळत नाही त्यामुळे अनेक आर्थिक दृष्ट्या असक्षम असलेल्यांना नागरिकांना पैशाअभावी प्राण गमवावा लागतो किंवा संपूर्ण आयुष्य त्या आजारासोबत घालवावे लागते. म्हणूनच, कोणत्याही व्यक्तीला उपचाराअभावी प्राण गमवावा लागू नये याकरिता सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राबविली आहे.

ही योजना पूर्वी राज्यात ०२ जुलै २०१२ पासून राजीव गांधी जीवनदायी योजना या नावाने सुरू करण्यात आलेली होती, परंतु नंतर शासन निर्णयान्वये नामांतर करून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या नावाने १३ एप्रिल २०१७ पासून सुरू करण्यात आली आहे. सध्या, राज्यात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही आयुष्यमान भारत –  प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसह एकत्रितपणे राबविली जाते.

दिनांक ०१ एप्रिल, २०२० पासून सुधारित  महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधान मंत्री जन आरोग्य योजना एकत्रितरित्या राज्यामध्ये ई निविदा पद्धतीने निवड करण्यात आलेल्या युनायटेड इंडिया इंशुरंस कंपनीतर्फे राबविण्यात येत आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे प्रमुख उद्दिष्ट –

या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला गंभीर आजारांवरील उपचार व शस्त्रक्रिया यासाठी पुर्णपणे निःशुल्क आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधेचा लाभ अंगीकृत रुग्णालयांमधून उपलब्ध करून देणे हा आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी एकूण पात्रता निकष

१) नोंदणीदार महाराष्ट्र राज्याचा नागरिक असणे आवश्यक.

२) या योजनेचा लाभ विशेषतः आर्थिक दृष्ट्या दुर्बल तसेच वार्षिक उत्पन्न हे एक लाखापेक्षा कमी असणारे असे सर्व राज्यातील नागरिक या योजनेसाठी पात्र असतील.

३) महाराष्ट्रच्या कोणत्याही जिल्ह्यातील गरीब कुटुंबातील पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असलेल्यांना नागरिकांना या योजनेस पात्र ठरणार आहे.

३) तसेच या योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीने पिडीत असलेले शेतकरी सुद्धा लाभ घेण्यास पात्र असणार आहे.

४) औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी व शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबे सुद्धा या योजनेसाठी पात्र असणार आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा विमा संरक्षण लाभ 

 • या योजनेअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला दर वर्षी महाराष्ट्र शासनाकडून दीड लाख रूपये पर्यंतचा आरोग्य विमा संरक्षण मिळणार आहे.  तसेच या योजनेअंतर्गत मुत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा २.५० लाख मिळू शकते.
 • जर आपण, आयुषमान भारत – प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा एकत्रित लाभ घेतला तर आपणास दर वर्षी प्रत्येक कुटुंबाला  एकुण ५ लाख रुपये किंमतीचा आरोग्य विमा संरक्षण त्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला मिळणे शक्य आहे.
 • तसेच, हि योजना पूर्णपणे निःशुल्क असल्याने या विम्याची संपूर्ण अंमलबजावणी युनायटेड इंडिया इंशुरंस कंपनी या सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीमार्फत होते. थोडक्यात, येथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा विमा हप्ता भरावा लागणार नाही.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची निःशुल्क सेवा

 • सदर योजनेअंतर्गत येणाऱ्या रूग्णास नि:शुल्क वैद्यकीय सेवा अंगीकृत रुग्णालयातून पुरवण्यात येईल.
 • या नि:शुल्क वैद्यकीय सेवांमध्ये रुग्णालयातील उपचार, निदानासाठी लागणाऱ्या सर्व चाचण्या, आवश्यक औषधोपचार, शुश्रुषा व भोजन आणि परतीचा प्रवास खर्च या सर्व गोष्टींचा समावेश असणार आहे.
 • तसेच रुग्णालयातून घरी परतल्यावर देखील पाठपुरावा सेवा आणि १० दिवसापर्यंत गुंतागुंत झाल्यास त्याचे मोफत उपचार या गोष्टीचा लाभ मिळणार आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील समाविष्ट उपचार आणि शस्त्रक्रिया

 • या योजनेतील ३४ विशेष सेवांतर्गत ९९६ उपचार व शस्त्रक्रिया तसेच १२१ पाठ्पुरावा सेवांचा समावेश होता. तर प्रधान मंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेअंतर्गत १२०९ उपचार व १८३ पाठपुरावा सेवांचा समावेश आहे.
 • सर्वसाधारणपणे स्त्री रोगावरील शस्त्रक्रिया, अस्थिव्यंग शस्त्रक्रिया, हृदय शस्त्रक्रिया व उपचार, जठर व आतड्याच्या शस्त्रक्रिया व उपचार, बालरोग शस्त्रक्रिया व उपचार, मेंदू व मज्जासंस्था या आजारावरील उपचार व शस्त्रक्रिया, कृत्रिम अवयव, प्लास्टिक सर्जरी, जळीत रुग्ण उपचार, आकस्मिक वैद्यकीय सेवा, लहान मुलांमधील कर्करोग, त्वचेचे आजार,  सांध्यावरील शस्त्रक्रिया, फुफ्फुसाच्या आजारांवरील उपचार, मानसिक आजार, ऐनडोक्राईन, इंटरवेन्शनल रेडीओलोजी, काम, नाक घसा शस्त्रक्रिया आणि नेफ्रोलोजी या उपचारांचा लाभ मिळू शकतो.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील रूग्णालयाबद्दल माहिती

 • यायोजनेअंतर्गत येणाऱ्या शासकीय आणि निमशासकीय रूग्णालये, खाजगी रूग्णालये तसेच धर्मादाय संस्थेच्या रुग्णालयांची निवड ३० पेक्षा अधिक खाटा असणाऱ्या निकषांच्या अधीन राहून करण्यात आली आहे.
 • सध्या योजनेतील खाजगी आणि शासकीय ९७३ रुग्णालये अंगीकृत असून, रुग्ण त्यांच्या इच्छेनुसार राज्यातील या अंगीकृत रुग्णालयात उपचार घेऊ शकतो.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत सहभागी होण्यासाठी पुढील कार्यपद्धती

रुग्ण तपासणी –

या योजनेत सहभागी होण्यासाठी किंवा योजनेचा लाभ मिळविण्यासाठी सदर व्यक्तीस/रुग्णास प्रथम जवळच्या एका शासकीय रुग्णालयात जाऊन संपूर्ण आजाराची तपासणी ही तज्ञ डॉक्टरांकडून करून घ्यावी लागले. जेणेकरून, आजाराची खात्री झाल्यास रोगाचा आणि खर्चाचा तपशील आरोग्य मित्र या पोर्टलवर नोंदवण्यात येईल.

आरोग्य मित्र –

आरोग्य मित्र या ऑनलाईन पोर्टलवर सदर व्यक्तीस या योजनेअंतर्गत उपचार घेण्यासाठी सहाय्य करतात. या पोर्टलवर रुग्णांच्या आजाराची व रुग्णालयाची माहिती आणि डॉक्टरांचा खर्च ऑनलाईन दाखल केला जाईल. या योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व अंगीकृत रुग्णालयात आरोग्य मित्र उपलब्ध आहे.

रुग्ण नोंदणी –

सदर व्यक्तीची/ रुग्णांची नोंदणी आरोग्य मित्रामार्फत केली जाते. रुग्ण नोंदणीच्या वेळी रुग्णाच्या नावाची पडताळणी ही त्याचे ओळखपत्र पाहून केली जाते. त्यांचे ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरल्या जाणाऱ्या कागद पत्रांची यादी www.jeevandayee.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असते.

मान्यता पूर्व उपचार –

 • या प्रकीयेमध्ये उपचारांसाठी मान्यता देण्यासाठी  कागदपत्रांची संपूर्ण पडताळणी संगणकप्रणालीवर केली जाते. या  पॅकेजनिहाय आवश्यक कागदपत्रांची यादी वरील संकेतस्थळावर उपलब्ध असते.
 • ही पूर्ण प्रक्रिया २४ तासात पूर्ण होणे अपेक्षित असते. इमर्जन्सी केसेस मध्ये रूग्णालयांद्वारे Emergency Telephonic Intimation (ETI) घेतले जाते. अशा केसेसमध्ये रुग्णांना वैध शिधापत्रिका १२० तासाच्या(कामाचे ५ दिवस) आत सादर करणे आवश्यक असते.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील आवश्यक कागदपत्रे

१) आधार कार्ड,

२) रेशन कार्ड,

३) सरकारी डॉक्टरांनी दिलेल्या आजाराचे प्रमाणपत्र,

४) वय प्रमाणपत्र,

५) अर्जदाराची तीन पासपोर्ट आकाराची फोटो

६)उत्पन्न प्रमाणपत्र

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया

१) सर्वांत प्रथम, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या https://www.jeevandayee.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

२) संकेतस्थळावर भेट दिल्यावर मुख्यपृष्ठ आपल्यासमोर उघडेल.

३) मुख्य पृष्ठावर, आपल्याला लॉगिन या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

४) त्यानंतर तुमच्या पुढे एक नवीन पृष्ठ उघडेल, त्यामध्ये आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड लिहावा लागेल.

५) त्यानंतर लॉगिन वर क्लिक करावे, अश्या प्रकारे तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.

६) नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही परत लॉगिन करावे.

७)  लॉगिन केल्यानंतर तुमच्यापुढे एक नवीन अर्ज स्क्रीनवर उघडेल.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या https://www.jeevandayee.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

८) त्या अर्जामध्ये आपल्याशी संबंधित सर्व माहिती भरावी लागेल आणि सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागेल.

९) त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावे.

१०) सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्ही नोंदणीकृत रुग्ण असाल आणि त्यानंतर तुम्हाला कोणत्याही सरकारी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी लाभार्थी असाल.

अधिक माहितीसाठी –

महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजने विषयी अधिक जाणून घेण्यासाठी –

टोल फ्री हेल्पलाईन नंबर : १८००-२३२-२०० आणि १५५३८८

https://www.jeevandayee.gov.in/

 

प्रश्न तुमचे उत्तर आमचे

 • महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे लाभ कोणते?

उत्तर – यायोजनेतसहभागी असलेल्या प्रत्येक कुटुंबाला दर वर्षी महाराष्ट्र शासनाकडूननिःशुल्कदीड लाखरूपयेपर्यंतचा आरोग्य विमा संरक्षण आणिहीचमर्यादा मुत्रपिंडप्रत्यारोपणासाठी२.५०लाखरूपये पर्यंतचा आहे. तसेच योजनेअंतर्गत रुग्णासअंगीकृत रुग्णालयातूनसंपूर्णनि:शुल्क वैद्यकीयउपचार, निदानासाठी लागणाऱ्या सर्व चाचण्या, आवश्यक औषधोपचार, शुश्रुषा व भोजन, परतीचा प्रवास खर्च, मोफतपाठपुरावा सेवा आणि १०दिवसांपर्यंतकाही गुंतागुंत झाल्यास मोफतउपचार सेवा उपलब्ध करून देण्यात येईल.

 • महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत नाव नोंदणी कशीकरावी?

उत्तर – महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतनाव नोंदणी करण्यासाठी रुग्णालयात असणाऱ्या आरोग्य मित्रांचीमदतमिळूशकते. योजनेमध्ये असणाऱ्या अंगीकृत रुग्णालयात आरोग्य मित्र उपलब्ध आहे. आरोग्य मित्र या योजनेअंतर्गत येणाऱ्या रूग्णाचीऑनलाईन नोंदणी करतात तसेच उपचार सुरू असताना योग्य तेसहकार्य आणि मदतदेखील करतात. सदररुग्णांचीनोंदणी आरोग्य मित्रामार्फतकेली जाते. आरोग्य मित्रावरनावनोंदणी करताना सदररुग्णांच्या नावाचीपडताळणी त्याचे ओळखपत्र आणि आवश्यक कागदपत्रे पाहूनकेलीजाते.

 • महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना २०२२ साठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

उत्तर –

 • आधार कार्ड,
 • रेशन कार्ड,
 • सरकारी डॉक्टरांनी दिलेल्या आजाराचे प्रमाणपत्र,
 • वय प्रमाणपत्र,
 • अर्जदाराची तीन पासपोर्ट आकाराची फोटो
 • उत्पन्न प्रमाणपत्र
 • महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील आजारांची आणि उपचारांची यादी कोणती ?

उत्तर – या योजनेत ३४ विशेष सेवांतर्गत ९९६ उपचार व शस्त्रक्रिया आणि १२१ पाठ्पुरावा सेवांचा समावेश होता. तर प्रधान मंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेअंतर्गत १२०९ उपचार व १८३ पाठपुरावा सेवांचा समावेश आहे.  स्त्री रोगावरील शस्त्रक्रिया, अस्थिव्यंग शस्त्रक्रिया, हृदय शस्त्रक्रिया व उपचार, जठर व आतड्याच्या शस्त्रक्रिया व उपचार, बालरोग शस्त्रक्रिया व उपचार, मेंदू व मज्जासंस्था या आजारावरील उपचार व शस्त्रक्रिया, कृत्रिम अवयव, प्लास्टिक सर्जरी, जळीत रुग्ण उपचार, आकस्मिक वैद्यकीय सेवा, लहान मुलांमधील कर्करोग, त्वचेचे आजार,  सांध्यावरील शस्त्रक्रिया, फुफ्फुसाच्या आजारांवरील उपचार, मानसिक आजार, ऐनडोक्राईन, इंटरवेन्शनल रेडीओलोजी, काम, नाक घसा शस्त्रक्रिया आणि नेफ्रोलोजी, इत्यादी.

 • महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत अंगीकृत रुग्णालयेकोणतीआहेत?

उत्तर –  ३०पेक्षा अधिक खाटा असणाऱ्याकोणत्याही शासकीय आणि निमशासकीय रूग्णालये, खाजगी रूग्णालये तसेच धर्मादाय संस्थेच्या रुग्णालयांची निवडयायोजनेच्या निकषांच्या अधीन राहून करण्यात आली आहे. यायोजनेतराज्यातील ९७६खाजगी आणि शासकीय रुग्णालयेअंगीकृत आहे, परंतु रुग्णत्यांच्या इच्छेनुसार राज्यातील कोणत्याही अंगीकृत रुग्णालयात या योजनेअंतर्गत उपचार घेऊ शकतो.

या लेखातून आम्ही तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची संपूर्ण माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. या सारख्याच नवनवीन आणि उपयुक्त योजनांचा लाभ घेण्याकरिता https://schemeofgovernment.com/ या संकेतस्थळाला अवश्य भेट देत राहा.

 

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना हॉस्पिटल लिस्ट | Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana | महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना contact number | महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना माहिती | महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना

Sharing Is Caring

Leave a Comment