Kisan Credit card Yojana | विनातारण लाखोंचे भांडवल देणारी ही सरकारी योजना तुम्हाला माहित आहे का ? 

शेती हा भारतात मोठ्या प्रमाणात केला जाणारा पारंपरिक व्यवसाय आहे. शेती व्यवसायाला भांडवल देखील अधिक लागते. पूर्वीच्या काळी गावांमधले सावकार शेतकऱ्यांना अधिक व्याजाने शेतीसाठी भांडवल उपलब्ध करून देत. यामध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिल पिळवणूक होत होती. अशातच सहकारी बँका, पतसंस्था व ग्रामीण सोसायट्या देखील शेतकऱ्यांना शेतीसाठी तारण कर्ज देऊ लागल्य. परंतु, केंद्र सरकारने( Central Goverment Scheme 2019)  शेतकऱ्यांना सहज व स्वस्त दरामध्ये कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना आणली. या योजनेमुळे शेतकऱ्यांना सावकारांच्या व सहकारी बँकांच्या भरमसाठ व्याजदरापासून मुक्ती मिळाली. जाणून घेऊयात kisan credit card योजनेबद्दल अधिक.

Kisan Credit card Yojana | किसान क्रेडिट कार्ड योजना  

Kisan Credit card Yojana ही केंद्र सरकारने खास शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली योजना आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना बी-बियाणे,कीटकनाशके, खते, मशागत व शेतीच्या इतर कामांसाठी केंद्र सरकार कडून बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध दिले जाते. 2018-19 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये  पशुपालन आणि मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ देण्याचे ठरविण्यात आले. इतकेच नाही तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड ( Kisan credit card) योजनेचा फायदा करून घ्यावा यासाठी सरकारने 2020 मध्ये पीएम किसान योजनेतील ( PM Kisan Yojana) शेतकऱ्यांना या योजनेमध्ये समाविष्ट केले. 2020 पर्यंत या योजनेअंतर्गत 14 लाख कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले होते. 

How to apply for Kisan credit card | किसान क्रेडिट कार्ड काढण्याची पद्धत 

किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम आपले किसान क्रेडिट कार्ड असणे आवश्यक आहे. हे किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला बँकेमध्ये ऑनलाइन किंवा ऑफलाईन  नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी झाल्यानंतर फॉर्म बँकेत जमा केल्यास पुढच्या दोन आठवड्यात तुमच्या पत्त्यावर बँकेकडून किसान क्रेडिट कार्ड पाठवले जाते. 

Banks for Kisan credit card | याच बँकांमध्ये नोंदणी करा 

किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी काही विशिष्ट राष्ट्रीयकृत बँकांमध्येच नोंदणी करणे आवश्यक आहे. यामध्ये ज्या बँकांचा समावेश होतो त्या खालीलप्रमाणे

 1. स्टेट बँक ऑफ इंडिया ( State Bank of India
 2. अँक्सिस बँक ( Axis Bank)
 3. पंजाब नॅशनल बँक ( Panjab National Bank
 4. बँक ऑफ इंडिया ( Bank of India) 
 5. एचडीएफसी बँक ( HDFC Bank)
 6. आयडीबीआय बँक (IDBI Bank)
 7. नाबार्ड ( NABARD) 
 8. इंडियन ओव्हरसीज बँक (Indian Overseas Bank) 
 9. इतर ग्रामीण बँका 

Kisan credit card online registration | ऑनलाइन नोंदणी 

 • किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी वरील पैकी कोणत्याही बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या. 
 • वेबसाईटवर गेल्यानंतर सर्च बॉक्स मध्ये ‘किसान क्रेडिट कार्ड’ किंवा ‘Kisan credit card’ असे सर्च करा
 • यानंतर समोर येणाऱ्या किसान क्रेडिट कार्ड लिंक वर क्लिक करा.
 • येथे किसान क्रेडिट कार्ड चे पेज उघडेल.या पेजवर ऑनलाइन नोंदणी ( Online Registration) चा ऑप्शन दिसेल. 
 • यावर दिसणाऱ्या फॉर्म वर क्लिक करून हवी ती सर्व माहिती भरा. 
 • माहिती भरून झाल्यावर ‘submit’ वर क्लिक करून फॉर्म जमा करा.

ऑनलाइन फॉर्म उपलब्ध नसल्यास 

यामधील सर्वच बँकांमध्ये ऑनलाइन फॉर्म उपलब्ध असण्याची शक्यता नाही. यामुळे ज्या बँकांमध्ये ऑनलाइन फॉर्म उपलब्ध होणार नाही तिथे ऑफलाईन फॉर्म भरणे आवश्यक आहे. यासाठी ऑफलाईन नोंदणी फॉर्म डाउनलोड करून त्यांची प्रिंट काढावी लागेल. या प्रिंट वरील सर्व माहिती व्यवस्थित भरून घेतल्यानंतरच तो फॉर्म बँकेत जाऊन जमा करावा. 

Kisan credit card Yojana Offline Registration| ऑफलाईन नोंदणी 

किसान क्रेडिट कार्ड साठी ऑफलाईन नोंदणी खालीलप्रमाणे करा. 

 • https://pmkisan.gov.in/documents/Kcc.pdf या link वर क्लिक करा.
 • येथे तुम्हाला ऑफलाईन नोंदणी फॉर्म मिळेल.
 • या फॉर्म ची प्रिंट काढून घ्या.
 • त्यावरील सर्व माहिती व्यवस्थित भरून आवश्यक कागदपत्रे जोडा.
 • हा फॉर्म संबंधित बँकेत जाऊन जमा करा.

Important Documents for Kisan credit card Yojana | आवश्यक कागदपत्रे 

किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. यामध्ये खालील कागदपत्रांचा समावेश होतो.

 1. सातबारा उतारा 
 2.  8-अ
 3. दुसऱ्या बँकेतून कर्ज न घेतल्याचं शपथपत्र
 4. आधार कार्ड
 5. पॅन कार्ड
 6. तीन पासपोर्ट साईज फोटो 

Eligibility or Age limit for Kisan credit card | पात्रता व मर्यादा 

किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा भारतीय व शेतकरी असायला हवा. तसेच 18 ते 75 वर्षे वयोगटातील व्यक्तीच किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी अर्ज करू शकतात. 

Advantages of Kisan credit card किसान क्रेडिट कार्ड चे फायदे 

 • किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणारे आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी व्यजदरासह त्वरित तीन लाखांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. 
 • किसान क्रेडिट कार्डद्वारे लोन (Kisan credit card loan) घेणाऱ्या शेतकऱ्यांना  अपंगत्व आले किंवा त्यांचा अपघाती मृत्यू झाला तर त्यांना 50 हजार रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. याशिवाय इतर धोक्यांसाठी 25 हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळते.
 • किसान क्रेडिट कार्ड योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कमी व्याजदर. या योजनेद्वारे मिळणाऱ्या कर्जावर 7 टक्के व्याजदर आकारला जातो. परंतु, शेतकरी कर्जाची परतफेड वर्षभरात करणार असेल, तर व्याजदरात 3 टक्के सवलत दिली जाते. म्हणजे फक्त 4 टक्के व्याजदाराने शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होते. शेतमालाच्या विक्रीतून शेतकऱ्यांनी या कर्जाची परतफेड करावी लागते. 
 • या योजनेतून शेतकऱ्यांना एक लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाते. 

Importamt Facts About Kisan credit card scheme | या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा 

 • किसान क्रेडिट कार्ड योजने अंतर्गत 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज दिले जाते  परंतु, त्यापेक्षा अधिक पण 3 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी तारण ठेवणे आवश्यक आहे.
 • या योजनेद्वारे शेतकऱ्यांना किती कर्ज द्यावे हे शेतकऱ्यांची एकूण जमीन, त्यांचे लागवडीखालील क्षेत्र व शेतीचे उत्पन्न यावरून ठरविले जाते. 
 • किसान क्रेडिट कार्ड हे तुमच्या बँकेतील बचत खात्याशी लिंक केलेले असते. दरवर्षी ते renew करणे आवश्यक आहे. 
 • किसान क्रेडिट कार्ड ची वैध्यता 5 वर्षांची असते. 
 • तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी नसाल तर किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला इंडियन बँक असोसिएशननं ( Indian Bank Association) कृषी कर्जासाठी तयार केलेला अर्ज भरून बँकेत जमा करावा लागेल. 
 • किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी वयोमर्यादा ही निश्चित असून 18 ते 75 वयोगटातील व्यक्तीच याचा लाभ घेऊ शकतात. 

kisan credit card संबंधित काही तक्रार असल्यास …

किसान क्रेडिट कार्ड संबंधित कुठलीही तक्रार असल्यास तुम्ही किसान क्रेडिट कार्ड पोर्टल वर जाऊन तुमची तक्रार नोंदवू शकता. तसेच उमंग या अँपच्या माध्यमातून देखील सहज तक्रार नोंदविता येऊ शकते. 

प्रश्न तुमचे उत्तर आमचे 

1) kisan credit card scheme चा उद्देश काय आहे ? 

– शेतकऱ्यांना बी-बियाणे,कीटकनाशके, खते, मशागत व शेतीच्या इतर कामांसाठी केंद्र सरकार कडून बँकांच्या माध्यमातून कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध व्हावे हा किसान क्रेडिट कार्ड योजनेचा उद्देश आहे. 

2) किसान क्रेडिट कार्ड साठी ऑफलाईन नोंदणी कशी करावी ?

-https://pmkisan.gov.in/documents/Kcc.pdf या link वर क्लिक करा.येथे तुम्हाला ऑफलाईन नोंदणी फॉर्म मिळेल.या फॉर्म ची प्रिंट काढून घ्या.त्यावरील सर्व माहिती व्यवस्थित भरून आवश्यक कागदपत्रे जोडा. हा फॉर्म संबंधित बँकेत जाऊन जमा करा.

3) किसान क्रेडिट कार्ड साठी ऑनलाइन नोंदणी कशी करावी | How to apply for Kisan credit card ?

-किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी वरील पैकी कोणत्याही बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.वेबसाईटवर गेल्यानंतर सर्च बॉक्स मध्ये ‘किसान क्रेडिट कार्ड’ किंवा ‘Kisan credit card’ असे सर्च करा.यानंतर समोर येणाऱ्या किसान क्रेडिट कार्ड लिंक वर क्लिक करा.येथे किसान क्रेडिट कार्ड चे पेज उघडेल.या पेजवर ऑनलाइन नोंदणी ( Online Registration) चा ऑप्शन दिसेल. यावर दिसणाऱ्या फॉर्म वर क्लिक करून हवी ती सर्व माहिती भरा. माहिती भरून झाल्यावर ‘submit’ वर क्लिक करून फॉर्म जमा करा.

4) kisan credit card मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ? 

– सातबारा उतारा, 8-अ, दुसऱ्या बँकेतून कर्ज न घेतल्याचं शपथपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड,तीन पासपोर्ट साईज फोटो ही कागदपत्रे किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी आवश्यक आहेत. 

5) kisan credit card Yojana अंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी तारण ठेवणे आवश्यक आहे का ? 

– किसान क्रेडिट कार्ड योजने अंतर्गत 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज दिले जाते  परंतु, त्यापेक्षा अधिक पण 3 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी तारण ठेवणे आवश्यक आहे.

6) kisan credit card Yojana अंतर्गत किती लाखांपर्यंतचे कर्ज मिळते ?

– किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत तीन लाखांपर्यंतचे कर्ज मिळते. 

7) kisan credit card Yojana कोण राबविते ?

– केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजना राबविली आहे. 

8)  पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना PM kisan credit card योजनेचा लाभ मिळू शकतो का ?

– होय 

10) kisan credit card Yojana चे मुख्य फायदे काय आहेत 

– किसान क्रेडिट कार्डद्वारे लोन घेणाऱ्या शेतकऱ्यांना  अपंगत्व आले किंवा त्यांचा अपघाती मृत्यू झाला तर त्यांना 50 हजार रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. याशिवाय इतर धोक्यांसाठी 25 हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळते. तसेच किसान क्रेडिट कार्ड योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कमी व्याजदर. या योजनेद्वारे मिळणाऱ्या कर्जावर 7 टक्के व्याजदर आकारला जातो. परंतु, शेतकरी कर्जाची परतफेड वर्षभरात करणार असेल, तर व्याजदरात 3 टक्के सवलत दिली जाते. म्हणजे फक्त 4 टक्के व्याजदाराने शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होते. शेतमालाच्या विक्रीतून शेतकऱ्यांनी या कर्जाची परतफेड करावी लागते. 

11) kisan credit card कोणत्या बँकांमध्ये उपलब्ध होते ? 

स्टेट बँक ऑफ इंडिया ( State Bank of India) ,अँक्सिस बँक ( Axis Bank), पंजाब नॅशनल बँक ( Panjab National Bank), बँक ऑफ इंडिया ( Bank of India) , एचडीएफसी बँक ( HDFC Bank), आयडीबीआय बँक (IDBI Bank), नाबार्ड ( NABARD) ,इंडियन ओव्हरसीज बँक (Indian Overseas Bank) ,इतर ग्रामीण बँका . 

या लेखातून आम्ही तुम्हाला Kisan Credit card Yojana संपूर्ण माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. या सारख्याच नवनवीन आणि उपयुक्त माहितीचा लाभ घेण्याकरिता https://schemeofgovernment.com/ या संकेतस्थळाला अवश्य भेट देत राहा.

Kisan Credit card Yojana | किसान क्रेडिट कार्ड योजना | kisan credit card scheme | kisan credit card online apply | pm Kisan Credit card

Sharing Is Caring

1 thought on “Kisan Credit card Yojana | विनातारण लाखोंचे भांडवल देणारी ही सरकारी योजना तुम्हाला माहित आहे का ? ”

Leave a Comment