12 वी पास सरकारी नोकरी महाराष्ट्र 2022. बारावी नंतर सरकारी नोकऱ्या कोणत्या ? कसा अर्ज करावा ?

12 वी पास सरकारी नोकरी महाराष्ट्र 2022 | बारावी नंतर सरकारी नोकऱ्या कोणत्या ? कसा अर्ज करावा ? मिळवा सविस्तर माहिती .

सरकारी नोकरी ही सुरक्षित नोकरी मानली जाते. गलेलठ्ठ पगार व सोयी सुविधा यामुळे सरकारी नोकरीला विशेष महत्त्व आहे. यामुळेच पूर्वी सरकारी नोकरी म्हणजे ताटात रोज भाकरीअशी म्हण प्रसिद्ध होती. सध्याची वास्तविकता पाहता नोकरी हे आजच्या तरुणांसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. कोरोनाच्या काळात खाजगी आणि सरकारी नोकऱ्यांच्या भरत्या थांबवण्यात आल्या होत्या, परंतु आता राज्यात बऱ्याच जागांसाठी रिक्त पदे भरणे सुरू आहे. या नोकऱ्या मिळवण्यासाठी काय करावे, कुठे अर्ज भरावा याची माहिती घ्या या लेखामध्ये.

बारावी नंतर मिळवता येतात या सरकारी नोकऱ्या | बारावी पास सरकारी नोकरी महाराष्ट्र 2022

1) पोस्टल भरती ( postal Recruitment)

भारतीय डाक खात्यामध्ये मेलगार्ड, पोस्टल असिस्टंट, क्लर्क,पोस्टमन या पदांसाठी दहावी व बारावी उत्तीर्ण मुलांना नोकरी मिळते. पोस्टातील परीक्षांचे फॉर्म भरून कायमस्वरूपी नोकरी देखील मिळवता येते.

2) रेल्वे भरती ( Railway Recruitment)

रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती केली जाते. यामध्ये उमेदवारांना परीक्षा द्यावी लागते. परंतु परीक्षा उत्तीर्ण होताच 40 ते 40 हजार इतका पगार मिळतो. टीसी पासून स्टेशन मास्तर पर्यंतच्या पदांसाठी ही भरती होते.

3) स्टेनोग्राफर (stenographer)

यामध्ये ग्रेड सी व ग्रेड च्या पदांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून परीक्षा घेतली जाते. या दोन्ही पदांसाठी वेगळे वेतन असते.

4) भारतीय संरक्षण दल ( indian Defence services)

आर्मी, एअर , नेव्ही अशा तिन्ही दलांमध्ये भारतीय संरक्षण दलामार्फत भरती केली जाते. यासाठी शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमता चाचणी घेतली जाते. संरक्षण दलात सुरुवातीला सातव्या आयोगानुसार 18 ते 20 हजार वेतन मिळते.

5) राज्य पोलिस( state police)

बारावी नंतर पोलिस दलात जायचे असल्यास कॉन्स्टेबल, होमगार्ड, शिपाई या पदासाठी भरती घेतली जाते. यांचे वेतन सुमारे 20 ते 25 हजार असते.

6) स्टाफ सिलेक्शन कमिशन उच्च माध्यमिक स्तर ( Ssc Combined Higher Secondary Level)

यामध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर, पोस्टल असिस्टंट, सॉर्टींग असिस्टंट, ज्युनिअर असिस्टंट, लो डिव्हिजन क्लर्क अशा पदांचा समावेश असतो. यामधून सुरुवातील किमान 18 हजार इतके वेतन मिळते.

महाराष्ट्रात सरकारी नोकऱ्यांसाठी मेगा भरती व रोजगार मेळावे भरवले जातात.

  • 12 वी पास सरकारी नोकरी महाराष्ट्र 2022| बारावी पास सरकारी भरती

महाराष्ट्र नागरी निवारा सुधार मंडळाने नुकतीच नायब तहसीलदार, सफाई कामगार, शिपाई यांच्या 3678 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी उमेदवार बारावी उत्तीर्ण असावा ही शैक्षणिक पात्रता असून 18 ते 45 वर्षाची वयोमर्यादा आहे.

बारावी पास सरकारी नोकरीसाठी असा करा अर्ज 

अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम https://freshgovtjobs.in/ या वेबसाईला भेट द्या. यामध्ये बातम्या विभागात 12वी पास सरकारी भरती 2022 अधिसूचनेवर क्लिक करून आवश्यक तो तपशील भरा.यासाठी लागणारी कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करावी. शेवटी अर्जाची फी भरून पावती घेणे आवश्यक आहे. याशिवाय अर्ज भरल्याची प्रिंट देखील घ्या.

  • पुणे 2022 मधील सरकारी नोकऱ्या

महाराष्ट्राच्या पुणे जिल्हा शासनाने विविध विभागांच्या रिक्त पदांसाठी भरती केली आहे. यामध्ये अंगणवाडी सहाय्यक, लिपिक, पोस्टमन, होमगार्ड, ड्रायव्हर, चौकीदार या पदांचा समावेश आहे. यासाठी 8 वी, 10वी, 12 वी पास अशी शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक असून सरकारी नियमानुसार 18 ते 45 वर्षे वयोमर्यादा आहे.

Online form | ऑनलाइन अर्ज करण्यासाठी

या पदांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://pune.gov.in/ या वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज करावा.

ड्रायव्हर नोकऱ्या 2022 ( Goverment Driver Jobs 2022)

सरकारी व सार्वजनिक क्षेत्रांमध्ये विविध ठिकाणी ड्रायव्हर पदासाठीच्या जागा रिक्त आहेत. परवाना धारक वाहक या जागांसाठी अर्ज करू शकतात.  सरकारी क्षेत्रात स्टाफ कार ड्रायव्हर, अवजड वहान चालक, इंजिन ड्रायव्हर, हलके मोटार वाहन चालक, H/C ड्रायव्हर, कॉन्स्टेबल ड्रायव्हर,मोटार ड्रायव्हर कम मेकॅनिक इत्यादी प्रकारच्या नोकऱ्या असतात. यासाठी 18 ते 25 वर्षाची वयोमर्यादा असते.

ड्रायव्हिंग च्या नोकरीसाठी पात्रता :

1)किमान 8 वी किंवा 10 वी पास

2) जड मोटार वाहन व हलके मोटार वाहन परवाना आवश्यक (HMV & LMV)

3) किमान 1 ते 3 वर्षांचा ड्रायव्हिंग अनुभव

रिक्त ड्रायव्हर नोकऱ्या 2022

1)  भारतीय हवाईदल येथे सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (04 रिक्त जागा)

अर्ज कसा करावा –  या पदासाठी पात्र उमेदवार जवळच्या कोणत्याही आयआर फोर्स स्टेशन वर अर्ज करू शकतो. अर्ज हिंदी किंवा इंग्रजी मध्ये व्यवस्थित टाईप करून कागदपत्रांसह पोस्टाने पोहोच करावा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 18 जुलै 2022

 2) अमरावतीच्या कृषी विज्ञान केंद्रात चालक व सहाय्यक कर्मचारी पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

वयोमर्यादा : ड्रायव्हर – 18 ते 30 वर्ष

सहाय्यक कर्मचारी – 18 ते 25 वर्ष

पात्रता निकष : दहावी उत्तीर्ण व ड्रायव्हिंग लायसन्स

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 जुलै 2022

ऑफलाईन अर्ज करण्यासाठी पता : कृषी विज्ञान केंद्र, अमरावती l, तपोवनेश्वर मंदिराजवळ,पोहरा, पोस्ट Tq.

3) रेल्वे मंत्रालयाकडून कुशल ड्रायव्हर ग्रेड III च्या 05 रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

अर्ज कसा करावा : या पदांसाठी पात्र उमेदवारांनी खोली क्रमांक 308,रेल्वे भवन,रफी मार्ग,नवी दिल्ली- 110001 या ठिकाणी आवश्यक कागदपत्रांसह जमा करावा.

लिपिक नोकरी 2022

  •  12 वी पास सरकारी लिपिक नोकऱ्या 2022 ( Goverment clerk jobs 2022)

भरातातील विविध सार्वजनिक व सरकारी ठिकाणी लिपिक पदाच्या जागा रिक्त आहेत. या पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता. लिपिक पद ही नोकरी अभिलेख ठेवणे, प्रशासकीय कामांची नोंद ठेवणे, फाईल करणे या कामांशी संबंधित असते. यातील लोवेस्ट डिव्हिजन क्लर्क (LDC) च्या पदांसाठी दहावी किंवा बारावी पास एवढीच शैक्षणिक पात्रता असते.

1) भारत सरकार व संरक्षण मंत्रालयामार्फत लिपिक पदाच्या (LDC) 1 जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी 18 ते 30 ची वयोमर्यादा असून शैक्षणिक पात्रता 12 वी पास व टायपिंग अशी आहे. यासाठी ऑफलाईन अर्ज करावा लागेल. याबाबतची सविस्तर माहिती संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर मिळेल.

अर्ज करण्याचा पत्ता – कमांडंट,आर्मी एअर डिफेन्स कॉलेज, गोलबंधा (PO),गंजम जिल्हा,ओडिशा- 701052

अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख – 18 जुलै, 2022 असेल.

  • Maharashtra Goverment and HCl Company Recruitment

एच.सी.एल कंपनी व महाराष्ट्र शासन यांच्या करारानुसार बारावीत ५० टक्के पेक्षा जास्त गुणांनी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अर्ली करिअर प्रोग्राम अंतर्गत कोर्सचे शिक्षण घेत नोकरी दिली जाणार आहे. बारावी नंतर नोकरी ( बारावी पास सरकारी नोकरी 2022) शोधणाऱ्या तरुणांसाठी हा कार्यक्रम आहे. यामधून वार्षिक उत्पन्न 2,20,000 च्या वर मिळवता येते.  मार्च –2021 व मार्च-2022 मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या नोकरीसाठी HCl च्या https://www.hcltechbee.com या वेबसाईटवर नोंदणी करू शकतात. 

  • राष्ट्रीय करिअर सेवेमार्फत नोकरीची संधी

राष्ट्रीय करिअर सेवा हा उपक्रम रोजगार महासंचालनालय, कामगार आणि रोजगार मंत्रालयामार्फत राबविण्यात येतो. यामार्फत दहावी बारावी झालेल्या तरुणांना नोकरीच्या ( बारावी पास सरकारी नोकरी महाराष्ट्र 2022 ) संधी मिळतात. राष्ट्रीय करिअर सेवा हे एक मोठे पोर्टल असून यावर नोकरी शोधणारे तरुण, नोकरी देणाऱ्या कंपन्या, नोकरीसाठी आवश्यक कौशल्ये देणारी प्रशिक्षण केंद्रे यांनी नोंदणी केल्या आहेत. यावर नोकरी मिळवण्यासाठी अर्ज करायचा असेल तर राष्ट्रीय सेवा पोर्टल उघडून आपले युजर खाते बनवणे आवश्यक आहे. राष्ट्रीय सेवा पोर्टल : https://www.ncs.gov.in

12 th pass Goverment Jobs Maharashtra 2022

1) सरकारी नोकरी मिळवण्यासाठी वारंवार नोकऱ्यांच्या अधिसूचना पाहणे आवश्यक आहे.

2) शासनाच्या अधिकृत संकेतस्थळांना वेळोवेळी भेट द्यावी.

3) नोकरी साठी आवश्यक कौशल्य आत्मसात करावी.

4) महत्त्वाची कागदपत्रे अपडेट केलेली असावीत.

5) महत्त्वाच्या तारखा, अर्ज केलेल्या पावत्या लक्षात ठेवाव्यात.

6) व्यक्तिमत्त्व विकासावर भर द्यावा.

7) सरकारी नोकरी मिळवण्यासाठी किमान 12 वी पास असणे आवश्यक असते. त्यामुळे बोर्डाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

अर्ज भरताना ही काळजी घ्या

1) सरकारी नोकरीचा अर्ज सादर करण्या आधी अर्ज भरण्याची मुदत तपासून पहावी. बऱ्याचदा मुदतीनंतर अर्ज भरला जातो.

2) ऑफलाईन अर्ज लिहायचा असल्यास अर्ज हिंदी किंवा इंग्रजी मध्ये योग्य पद्धतीने लिहावा.

3) अर्ज पोस्टाने पाठवायचा असल्यास त्यावर योग्य पत्ता टाकावा.

4) ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर अर्जाची एक प्रिंट स्वतःजवळ ठेवावी.

5)आवश्यक कागदपत्रे, सही व फोटो व्यवस्थित स्कॅन करून पाठवावा.

सरकारी नोकऱ्यांसाठी प्रवेश परीक्षा देताना

बऱ्याच सरकारी नोकऱ्यांसाठी ( 12th pass goverment jobs maharashtra 2022) प्रवेश परीक्षा व मुलाखत घेतली जाते. यासाठी काय अभ्यास करावा हा अनेकांसमोर प्रश्न असतो. सरकारी नोकऱ्यांसाठी परीक्षा देताना पायाभूत गणित, मराठी, इतिहास, भूगोल आणि सामान्य ज्ञान असणे आवश्यक आहे. या सोबतच रिझनिंग चा सुदधा थोडाफार अभ्यास असावा. सरकारी नोकऱ्यांसाठी मुलाखत देताना मात्र विशेष काळजी घ्यावी. आपला व्यवस्थितपणा, आपली भाषा, आपले वागणे आणि आपली संवाद कौशल्य यावेळी पाहिली जातात.

प्रश्न तुमचे उत्तर आमचे

1) सरकारी नोकऱ्यांची माहिती कोणत्या संकेतस्थळांवर मिळते ?

सरकारी नोकऱ्यांची माहिती नोकरी देणाऱ्या सरकारी संस्थांच्या अधिकृत संकेतस्थळावर मिळते.

2) 12 वी पास मुलांना सरकारी नोकरी मिळू शकते का ?

हो. 10 वी 12 वी पास मुलांना देखील सरकारी नोकरी मिळते.

3) बारावी पास मुलांसाठी कोणत्या सरकारी नोकऱ्या असतात ?

स्टाफ सिलेक्शन कमिशन एकत्रित उच्च माध्यमिक स्तर, राज्य पोलिस, भारतीय संरक्षण दल, रेल्वे भरती, पोस्टल भरती, स्टेनोग्राफर यामध्ये बारावी पास मुलांसाठी सरकारी नोकऱ्या असतात.

४) सरकारी नोकरीच का?

सरकारी नोकऱ्या स्थायित्व देतात. यातून मोठ्या प्रमाणात वेतन मिळते, शिवाय सरकारी नोकऱ्यांमधून सोयी व सवलती देखील मिळतात. म्हणून सरकारी नोकऱ्या मिळवण्यावर लोकांचा भर असतो.

५) सरकारी नोकरी मिळवण्यासाठी काय करावे ?

1) सरकारी नोकरी मिळवण्यासाठी वारंवार नोकऱ्यांच्या अधिसूचना पाहणे आवश्यक आहे.

2) शासनाच्या अधिकृत संकेतस्थळांना वेळोवेळी भेट द्यावी.

3) नोकरी साठी आवश्यक कौशल्य आत्मसात करावी.

4) महत्त्वाची कागदपत्रे अपडेट केलेली असावीत.

5) महत्त्वाच्या तारखा, अर्ज केलेल्या पावत्या लक्षात ठेवाव्यात.

6) व्यक्तिमत्त्व विकासावर भर द्यावा.

7) सरकारी नोकरी मिळवण्यासाठी किमान 12 वी पास असणे आवश्यक असते. त्यामुळे बोर्डाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

या लेखातून आम्ही तुम्हाला नवीन 12 वी पास सरकारी नोकरी महाराष्ट्र 2022 याची माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. या सारख्याच नवनवीन आणि उपयुक्त योजनांचा लाभ घेण्याकरिता https://schemeofgovernment.com/ या संकेतस्थळाला अवश्य भेट देत राहा.

 

 

Sharing Is Caring

9 thoughts on “12 वी पास सरकारी नोकरी महाराष्ट्र 2022. बारावी नंतर सरकारी नोकऱ्या कोणत्या ? कसा अर्ज करावा ?”

Leave a Comment