नमस्कार मंडळी. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण 2022 या लेखामध्ये आज आपण सरकारद्वारे राबवली जाणारी स्वच्छ भारत अभिनव ( SBM) योजनेची सविस्तर माहिती घेणार आहोत. या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं तसेच ग्रामीण परिसर सुधारण्यासाठी आपण एक सुजाण नागरिक म्हणून स्वतः कशी मदत करू शकतो याबद्दलही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचावा.
स्वच्छ परिसर, पिण्यायोग्य पाणी आणि कचऱ्याची योग्य पद्धतीने केलेली विल्हेवाट या सर्व घटकांवर मानवाचे आरोग्य अवलंबून असते. गढूळ पाणी, अस्वच्छ परिसर तसेच अयोग्य पद्धतीने केलेली मलमूत्राची विल्हेवाट यामुळे रोगराई झपाट्याने वाढत आहे. यामुळे विकसनशील देशाची वाढ खुंटते. लोकसंख्येच्या गणतीत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. जेवढी जास्त लोकसंख्या तेवढी स्वच्छतेची अधिक गरज ! ही बाब लक्षात घेता सरकारने १९८६ साली केंद्रीय ग्रामीण स्वच्छता कार्यक्रमाची (CRSP) अंमलबजावणी केली.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण ( SBM) अंतर्गत स्वच्छतेचे महत्व आणि अस्वच्छतेचे परिणाम
मानवी मलमूत्राचे योग्य पद्धतीने विघटन होणे महत्वाचे आहे. WHO च्या निरीक्षणात असं आढळून आले आहे कि उघड्यावर मलमूत्र विसर्जन केल्याने बॅक्टरीया तसेच इतर जीवघेणी रोगजंतू झपाट्याने पसरतात. यामुळे अतिसार, कॉलरा, मलेरिया यासारखे आजार वाढत आहेत.
- ५ वर्षाखालील मुले ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने ते अतिसार सारख्या आजरांना बळी पडत आहेत. UNICEF च्या दाव्यानुसार विकसनशील देशात अतिसारामुळे दरवर्षी १.५ दशलक्ष मुले मरण पावतात.
- अस्वच्छतेचा नाहक त्रास स्त्रियांना सुद्धा भोगावा लागत आहे. आजही अनेक खेड्यापाड्यातील स्त्रियांना उघड्यावर शौचास जावे लागते. यामुळे त्यांचा आत्मविश्वास तर कमी होतोच शिवाय सततची भिती, लाज आणि छळ या गोष्टींनाही सामोरे जावे लागते.
- अयोग्य पद्धतीने केलेले कचऱ्याचे व्यवस्थापन याचा थेट परिणाम पर्यावरणावर होतो. प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट उपलब्ध जलस्रोतांमध्ये जाते त्यामुळे सागरी जीवनावर याचा परिणाम होतोय. लाखो लोकांना रोगांचा सामना करावा लागत आहे.
या लाजस्पद बाबीकडे लक्ष देऊन जनसामान्याने स्वच्छ भारत मिशन ग्रामीणविषयी जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे तसेच विचारपूर्वक पाऊल उचलून (SBM) या योजनेची माहिती घेऊन त्याचा लवकरात लवकर लाभ घ्यावा असे आवाहन सरकारतर्फे करण्यात येते.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण पार्श्वभूमी
ग्रामीण भागासाठी विशेषतः केंद्र सरकारच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेचा एक भाग म्हणून पहिला स्वच्छता कार्यक्रम १९५४ मध्ये सुरु करण्यात आला. दरम्यान ग्रामीण भागात स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याची गरज असल्याचे सरकारच्या लक्षात आले. ग्रामीण लोकांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारणे आणि महिलांना सन्मान मिळवून देण्याच्या प्राथमिक उद्देशाने केंद्रीय ग्रामीण स्वच्छता कार्यक्रमाची (CRSP) अंमलबजावणी १९८६ साली करण्यात आली. यामध्ये वैयक्तिक स्वच्छता, सांडपाण्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे, घनकचऱ्याचे व्यवस्थापन, पिण्यायोग्य शुद्ध पाणी अशा गोष्टींचा समावेश करण्यात आला.
जनजागृती करण्याची गरज अधिक असल्याने वरील बाबींसमवेत मागणी आधारित दृष्टिकोनासह केंद्रीय ग्रामीण स्वच्छता कार्यक्रमाचे रूपांतर संपूर्ण स्वच्छता अभियान असे झाले (TSC).
या अभियानामध्ये ग्रामीण भागात जनजागृती निर्माण व्हावी व स्वच्छतेविषयी योग्य माहिती लोकांना कळावी यासाठी माहिती, शिक्षण तसेच मानव संसाधन विकास यावर भर देण्यात आला. दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबांना वैयक्तिक घरगुती शौचालये (IHHL) बांधण्यासाठी आणि वापरण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन देण्यात आले. यासोबतच शालेय स्वच्छतागृह, अंगणवाडी शौचालये बांधण्यासाठी सरकारकडून निधी देण्यास सुरवात झाली.
स्वच्छ ग्रामीण भागांना प्रोत्साहनपर ‘निर्मल ग्राम पुररस्कार ‘ देण्यात आला. याची लोकप्रियता एवढ्या प्रमाणात वाढली कि आपल्या गावांना निर्मल दर्जा मिळावा यासाठी प्रत्येक समाज प्रयत्न करू लागला. याची दखल घेत संपूर्ण स्वच्छता अभियानाला नवी गती देण्याकरिता केंद्र सरकारने ‘निर्मल भारत अभियान’ (NBA) १ एप्रिल २०१२ साली सुरु केला.
स्वच्छ भारत मिशन परिचय (swachh bharat mission) (2014-2019)
भारतामध्ये सार्वत्रिक स्वच्छता कव्हरेज प्राप्त करण्याच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी आणि सुरक्षित स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी भारताच्या पंतप्रधानांनी २ ऑक्टोबर २०१४ रोजी स्वच्छ भारत मिशन (swachh bharat mission) लाँच केले. महात्मा गांधींना त्यांच्या १५० व्या जयंतीदिनी श्रद्धांजली म्हणून २ ऑक्टोबर २०१९ पर्यंत स्वच्छ भारत साध्य करण्याचे सरकारचे उद्दिष्ट होते. यावेळी उघड्यावर शौच करण्याची प्रथा पूर्णपणे बंद करण्यात आली.
- स्वच्छ भारत मिशन (swachh bharat mission) अंतर्गत दोन उप अभियान सरकारने स्थापन केले. पहिले म्हणजे स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) पेयजल आणि स्वच्छता विभाग अंतर्गत आणि गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय अंतर्गत स्वच्छ भारत मिशन (शहरी). संपूर्ण स्वछता अभियानाचे काम पेयजल आणि स्वच्छता विभागाद्वारे केले जाते. ग्रामीण भागात खुल्या शौचास मुक्त (ODF) गावे साध्य करणे आणि अनेक उपक्रमांद्वारे संपूर्ण स्वच्छतेचे स्तर सुधारणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
- स्वच्छ भारत मिशन ग्रामीण जनआंदोलन स्वरूपात स्वच्छतेची माहिती लोकांना पटवून देत असल्याने ग्रामीण भारताचा कायापालट होत आहे. २०१४ मध्ये स्वच्छ भारत अभियान याची अंमलबजावणी झाल्यापासून, सुमारे १० कोटींहून अधिक शौचालये बांधण्यात आली आहेत.
- परिणामी ऑक्टोबर २०१९ पर्यंत देशभरातील सर्व गावे आणि एकूण ३६ राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांनी स्वतःला ‘हागणदारी मुक्त‘ घोषित केले होते.
- जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल पुरवठा आणि स्वच्छता विभागाने सप्टेंबर 2019 मध्ये हागणदारी मुक्त गाव आणि घन कचरा व्यवस्थापन व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी १० वर्षांचे ग्रामीण स्वच्छता धोरण विकसित केले.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण Phase 2 (2020-21 ते 2024-25)
SBM(G) फेज १ चे मुख्य उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर भारत सरकारने या अभिनयाच्या दुसऱ्या टप्प्याच्या मंजुरीसह ग्रामीण भागात स्वच्छता आणि स्वच्छतेची स्थिती वाढवण्याच्या उद्देशाने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण फेज २ चे नूतनीकरण केले. Swachh Bharat Mission Gramin Phase 2 ची रचना ग्रामीण भारतात लोकचळवळींद्वारे हागणदारीमुक्त गावाची स्थिती टिकून राहावी तसेच घन कचरा व स्वच्छतेचं योग्य व्यवस्थापन व्हावं यासाठी करण्यात आली.
२०२०–२१ ते २०२४–२५ या कालावधीमध्ये अभियाना अंतर्गत १,४०,८८१ कोटी रुपयांच्या एकूण अंदाजित खर्चासह फेज २ लागू केला जाईल. हागणदारीमुक्त गावाचे ध्येय साध्य करण्यासाठी तसेच स्वच्छता सुविधा पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे या मॉडेलवर काम करणार आहेत.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण Phase 2 उद्दिष्ट
- स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) चे मुख्य उद्देश हे गावांचा हागणदारीमुक्त दर्जा टिकवून ठेवणे आणि घन व द्रव कचरा व्यवस्थापन उपक्रमांद्वारे ग्रामीण भागात स्वच्छतेचे स्तर सुधारणे हा होय.
- संपूर्ण गाव हागणदारीमुक्त झाले आहे याची खात्री करून घेणे. माहिती, शिक्षण आणि तंत्रदान याद्वारे गावात वेळोवेळी आवश्यक ते बदलाव करून घेणे. गावातील सर्व कुटूंब, प्राथमिक शाळा, पंचायत घर आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये शौचालयाची सुविधा आहे याची तपासणी करणे.
- घन कचरा व्यवस्थापन : किमान ८० टक्के घरे आणि सर्व सार्वजनिक ठिकाण जसे, प्राथमिक शाळा, पंचायत घर आणि अंगणवाडी केंद्रासह घनकचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन केले जात आहे की नाही याची खात्री बाळगणे. यामध्ये वैयक्तिक आणि सामुदायिक कंपोस्ट खड्ड्यांद्वारे गुरांच्या जैव–विघटनशील कचऱ्याचे विघटन तसेच प्लास्टिक कचऱ्याचे पुरेसे विलीगीकरण करूणे याचा समावेश आहे.
- द्रव कचरा व्यवस्थापन : ज्या सर्व घटकांचा द्रव कचऱ्यात समावेश होतो त्याचे योय व्यवस्थापन करणे. किमान ८० टक्के घरे आणि सर्व सार्वजनिक ठिकाणी (प्राथमिक शाळा, पंचायत घर आणि अंगणवाडी केंद्रासह) द्रव कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन करून घेणे. यामध्ये स्वयंपाक घरातील पाण्याच्या वापरामुळे आणि आंघोळीतून निर्माण होणारे राखाडी रंगाचे पाणी, व्यक्तिगत किंवा सामुदायिक स्तरावर बुजविलेल्या खड्यांतून येणारे पाणी आणि सेप्टिक टाक्यांमधून ओव्हरफ्लो झालेले काळ्या रंगाचे पाणी याची विल्हेवाट लावणे या बाबी समाविष्ट आहेत.
- दृश्यदेखत स्वछता : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत गाव स्वच्छ म्हणून वर्गीकृत करण्यासाठी किमान ८० टक्के घरांमध्ये आणि सर्व सार्वजनिक ठिकाणी किमान कचरा आणि कमीतकमी अस्वच्छ पाणी असल्याचे निदर्शनास आले पाहिजे. तसेच प्लास्टिक कचरा ढिगाऱ्याच्या स्वरूपात साचणार नाही याची खात्री करून घेणे.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्त्वे
योजनेचा लाभ सर्व स्तरातील नागरिकांना घेता यावा : प्रकल्प कालावधीत समाविष्ट सर्व नवीन घरांना तसेच पहिल्या फेज मधील पात्रता कुटूंबाना स्वच्छता सुविधा उपलब्ध करून देणे. हागणदारी मुक्त पात्रता कुटुबांची ओळख जिल्हा परिषद कडून केली जाईल. | ज्या कुटुंबाना जागेच्या कमतरतेमुळे वैयक्तिक घरगुती शौचालये नाहीत अशा कुटुंबांसाठी सामान्यतः कम्युनिटी सॅनिटरी कॉम्प्लेक्स (CSC) म्हणून ओळखल्या जाणार्या सामुदायिक व्यवस्थापित स्वच्छता संकुलाची तरतूद केली जाऊ शकते. |
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण | स्वच्छ भारत मिशन ग्रामीण योजने अंतर्गत नवीन बांधकाम/ सुधारणा केली जाईल. |
व्यवसाय मॉडेल्सचा वापर/स्वयं–शाश्वत महसूल मॉडेल तयार करणे : व्यावसायिकांने स्वयं– शाश्वत महसूल मॉडेल तयार करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात फॅक्टरी मधील दूषित पाणी नदी नाल्यात सोडले जाते. यावर संबंधित राज्य सरकारने ग्रामीण भागातील लोकांमध्ये जनजागृती निर्माण करून खाजगी क्षेत्रातील व्यावसायिकांना घन कचऱ्याचे योग्य विघटन करण्याचे आवाहन करणे. | सरकारने योग्य शास्वत मॉडेलची निवड करणे: अंमलबजावणीची यंत्रणा ठरविण्यासाठी राज्य सरकारने हवामान परिस्थिती नुसार अनुकूल तंत्रज्ञान वापरावे. |
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण Phase 2 घटक आणि पात्रता (2021-2024)
1. माहिती शिक्षण, सवांद व क्षमता बांधणी उपक्रम :
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण हे केवळ शौचालय बांधण्यासाठीच नाही तर स्वच्छतेच्या चांगल्या पद्धती अंगीकारण्यासाठी तसेच जनतेच्या वर्तनात बदल घडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जनतेमध्ये स्वच्छते विषयी जनजागृती करणे महत्वाचे असल्याने माहिती, शिक्षण आणि संवाद (IEC) धोरणे, नियोजन आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी हे स्वच्छ भारत मिशन करिता महत्वाचे घटक मानले जाते.
2. वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम :
वैयक्तिक शौचालय बांधकासाठी ग्रामपंचायत द्वारे आता साहाय्य केले जाणार आहे. सर्व ग्रामीण कुटुंबाना सुरक्षित शौचालये मिळतील याची खात्री करणे हे या मिशनचे उद्दिष्ट आहे. यासाठी नवनवीन आणि सुरक्षित तंत्रज्ञानाची माहिती मिळवून योग्य शौचालय निवडणे आणि त्याची अंमलबजावणी करण्यात येते. खालील कुटुंबे योजने अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाकरिता पात्र ठरतील.
- दारिद्र रेषेखालील सर्व कुटुंब
- अनुसूचित जाती जमातीतील कुटुंबे, कुटुंबातील एखादी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या अपंग असलेली कुटुंबे, भूमीहीन शेतमजूर, लहान आणि अत्यल्प शेतकरी
- वैयक्तिक शौचालयासाठी १२,००० रुपये पर्यंत अनुदान दिले जाईल
- इतर कोणत्याही ग्रामीण गृहनिर्माण योजने अंतर्गत बांधलेल्या घरातील ज्या कुटुंबांकडे शौचालय नाही त्यांनी स्वच्छता सुविधा निर्माण केल्यास ते स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मिळणाया प्रोत्साहन अनुदानास पात्र राहतील.
3. सार्वजनिक शौचालये :
गावठीकाणी सार्वजनिक शौचालये बांधणे हा स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत एक घटक आहे. यामध्ये पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र सुविधा असतील. तसेच योग्य संख्येने टॉयलेट सीट्स, आंघोळीसाठी क्यूबिकल्स, कपडे धुण्याकरिता जागा, वॉश बेसिन इत्यादींचा समावेश असेल.
4. घनकचरा व्यवस्थापन :
घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत ग्रामीण जनजीवन सुधारण्यासाठी गांडूळ खत निर्मिती, बायोगॅस प्रकल्प, सार्वजनिक शोषखड्डे असे अनेक उपक्रम राबविता येतील.
ग्रामीण भागात मलमूत्र व्यवस्थापन कसे असावे ?
ग्रामीण भागात मलमूत्राचे सुरक्षित व्यवस्थापन हा स्वच्छतेच्या घटकांपैकी एक भाग आहे. नवीन तंत्रज्ञानाबद्दल अपुरी माहिती, पारंपरिक वागणूक आणि आर्थिक अडचणी यामुळे उघड्यावर मल विसर्जन मोठया प्रमाणावर केले जाते. उघड्यावर मलमूत्राचे विसर्जन केल्याने त्याचा परस्पर संबंध हा पिकांद्वारे अन्नासोबत होतो. त्यामुळे सुरक्षित स्वच्छता आणि पद्धतींचा अवलंब करून मलमूत्राचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. यासाठी योग्य डिझाईनचे शौचालय असणे महत्वाचे आहे.
गावठीकाणी आदर्श शौचालय बांधण्यासाठीचे निकष खालील प्रमाणे आहेत.
- आर्थिकदृष्ट्या परवडणारे असावे
- कमीतकमी पाण्याचा योग्य वापर होईल याकडे लक्ष द्यावे
- कमी जागेत वापरण्यास सुलभ असे शौचालय बांधावे
- रोगराईपासून मुक्त असणे आवश्यक
- बांधकाम मजबूत असावे
वरील गोष्टींची पूर्तता करत आज गावपातळीवर शौचालयांचे बांधकाम करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत.
- दोन पाझर खड्ड्यांचे शौचालय
- सेप्टीक टँक पद्धतीचे शौचालय
- काम्पोस्ट किंवा इकोसॅन पद्धतीचे शौचालय
- बायोगॅस पद्धतीचे शौचालय
दोन शोष खड्ड्यांचे शौचालय
शाश्वततेच्या दृष्टीने, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत घरगुती आणि सामुदायिक स्तरावर दोन शोष खड्ड्यांचे शौचालयांना प्रोत्साहन दिले जाते. जेथे भूजल पातळी २ मीटर खोलीपेक्षा कमी असते.
दोन शोष शौचालय खड्ड्यांचे प्रमुख घटक
हे कमी खर्चाचे आहे. कमी जागा आणि कमी पाणी लागते. मलगाळ खड्डा रिकामा करणे सोपे असते आणि खड्ड्यातील खत शेतीसाठी वापरता येते.
1. लीच खड्ड्यांमध्ये मधाची पोळी असल्यासारखे बांधकाम
पहिला थर ९” रुंद असणे आवश्यक आहे. खड्यांचे बांधकाम करताना वर्तुळ आकारात बांधकाम करावे. साधारणपणे २ इंच रूंदीची ६ ते ७ भोके असावीत यामुळे खड्यात जाणारे पाणी आणि वायू मातीत सहजपणे शोषून घेतले जातात.
2. पाईप
१०० मिमी पीव्हीसी पाईपचा वापर करणे. पाईपचा व्यास ४ इंच असावा. पाईप भिंतीच्या आत ६ इंच आत जाणे आवश्यक. कमीत कमी पाण्याने मलमूत्राचा प्रवाह सुरळीत व्हावा यासाठी बेंड वापरणे टाळा.
3. जंक्शन चेंबर
मलमूत्राचा प्रवाह एका खड्यातून दुस-या खड्यात वळवण्यासाठी ही एक विशेष रचना आहे.
4. पाणी सील ट्रॅप
20 मि.मि. वॉटर सील असलेला ट्रॅप, (कोंबडा) व 25 ते 30 अंशाचा उतार असलेले 20 इंची मलपात्र वापरणे आवश्यक. यामुळे पाण्याचा कमी प्रमाणात वापर होईल.
5. शोष खड्यांवरील झाकण
शोष खड्डे योग्य प्रकारे झाकणे आवश्यक आहे. याकरिता चांगल्या दर्जाच्या शाहाबाद टाइल्स किंवा कडप्पा दगड हे झाकण म्हणून सोयीस्करपणे वापरले जाऊ शकते. प्रत्येक शौचालयासाठी ४ फूट x २ फूट आकाराचे चार कडप्पे आवश्यक आहेत. तसेच शोष खड्यांवर अच्छादन म्हणून आरसीसी चे सिमेंट स्लॅब देखील वापरले जाऊ शकतात.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत ऑनलाईन अर्ज दाखल करावयाची पद्धत
आपण स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत पाहणार आहोत.( Swachh Bharat Mission Gramin 2.0 घटक आणि पात्रता ) वरील माहिती दिल्याप्रमाणे सर्व पात्रता कुटुंबाना आधुनिक तंत्रज्ञान वापरून वैयक्तिक शौचालये उपलब्ध व्हावीत यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
- सर्वात पहिले पात्रता कुटुंबाने अनुदान मिळविण्याकरिता तसेच swachha bharat mission gramin toilet list या यादीत आपले नाव मिळविण्या करिता अर्ज दाखल करताना आपण शौचालय बांधले आहे याची नोंद करावी.
- http://swachhbharaturban.gov.in/ या लिंक वर क्लिक करून अर्ज दाखल करावा.
- योग्य ती माहिती भरून आपण योजनेचा लाभ घेऊ शकता
आपल्या गावात स्वछता राखली जावी तसेच गावाला हगणदारी मुक्त करावे हि जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. ग्रामीण स्तरावर ‘हगणदारी मुक्त’ गाव करण्यासाठी सरकार सुद्धा प्रयत्नशील आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सरकार करीत असते. या लेखातून आम्ही तुम्हाला योजनेची संपूर्ण माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. या सारख्याच नवनवीन आणि उपयुक्त योजनांचा लाभ घेण्याकरिता https://schemeofgovernment.com/ या संकेतस्थळाला अवश्य भेट देत राहा.
| स्वच्छ भारत मिशन ग्रामीण | swachha bharat mission gramin apply online | swachha bharat mission gramin toilet list |