शेळीपालन कर्ज योजना 2022 Online Form

शेळीपालन कर्ज योजना  सरकारच्या ‘या’ मोठ्या योजनेचा लाभ तुम्ही घेतलाय का ?

 महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. येथील अनेक शेतकरी व त्यांची कुटुंबे शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. पंरतु आजकाल पशुपालन करून शेतकरी उत्पन्नाचा नवीन स्त्रोत तयार करताना पहायला मिळत आहेत. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी कायम प्रयत्नशील असते. यामुळेच आता महाराष्ट्र सरकारने पशुसंवर्धनाला चालना देण्यासाठी नवीन योजना सुरू केली आहे. पण कसंय ना शेतकरी मित्रांनो ! एखादी सरकारी योजना येते आणि त्याचा कालावधी देखील संपून जातो. तरीही तुमच्यापर्यंत त्या योजनेबद्दल माहिती पोहोचत नाही. यासाठीच आम्ही ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. जाणून घेऊयात सरकारच्या शेळीपालन कर्ज योजनेबद्दल अधिक !

Shelipalan Karj Yojana | शेळीपालन कर्ज योजना

शेळीपालन कर्ज योजना  योजनेमार्फत राज्यसरकार शेळीपालन व्यवसाय करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करते. शेळीपालन करून शेळी फार्म उघडण्यासाठी महाराष्ट्र सरकार ( Mharashtra Government)  शेळीपालन कर्ज योजनेअंतर्गत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देते.

शेळीपालन कर्ज योजना उद्देश

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर शेळीपालन केले जाते. शेतकऱ्यांना शेती व्यतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत निर्माण व्हावा यासाठी पशुपालन व्यवसाय मदत करतो. यामुळे राज्यसरकारने ग्रामीण भागात पशुसंवर्धन व्यवसायास चालना देण्यासाठी शेळीपालन कर्ज योजना सुरू केली. राज्यात शेळीपालनाचे क्षेत्र वाढवून दूध व मांस उत्पन्नात वाढ करणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.  शेळीपालनाची आवड असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने हा व्यवसाय सुरू करावा व जास्तीत जास्त पैसे कमवावे हा हेतुदेखील या योजनेमागे आहे

शेळीपालन कर्ज योजना पात्रता | Eligiblity For Shelipalan Loan 2022

1) शेळीपालन कर्ज योजना 2022 या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकरी घेऊ शकतात.

2) यामध्ये शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.

3) शेळीपालन कर्ज योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना शेळी पालनाचा अनुभव असायला हवा.

4) स्वतःची जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

5) अनुसूचित जाती व जमातीच्या अर्जदारांना जात प्रमाणपत्र देणे बंधनकारक असणार आहे.

शेळीपालन कर्ज योजना आवश्यक कागदपत्रे | Important Documents

1) आधारकार्ड

2) बँक पासबुक

3) मतदार ओळखपत्र

4) जमीन दस्तऐवज

5) पत्त्याचा पुरावा

6) वार्षिक उत्पन्नाचा दाखला

7) पासपोर्ट आकाराचा फोटो

8) जात प्रमाणपत्र

9) मोबाईल नंबर

शेळीपालन कर्ज योजना अर्ज करण्याची पद्धत

शेळीपालन कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी रीतसर अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज करता येतो.

Online Application for Shelipalan Karj yojana | शेळीपालन कर्ज योजनेसाठी ऑनलाइन अर्ज

1) शेळीपालन कर्ज योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करताना सर्वप्रथम योजनेसाठीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायला हवी. यासाठी http://mahamesh.co.in या संकेतस्थळावर जा.

2) येथे वेबसाईटचे होम पेज दिसेल. यावर दिसणाऱ्या महामेश या पर्यायावर क्लिक करा.

3) येथे तुम्हाला अर्जदार व लॉगिन चा पर्याय पहायला मिळेल. लॉगिन करताना अर्जदाराचा आधार क्रमांक टाकून कॅप्चा कोड टाका.

4) लॉगिन झाल्यानंतर नवीन पेज उघडेल. याठिकाणी योग्य ती माहिती भरावी.

5) माहिती भरल्यानंतर ती सेव्ह करायची विसरू नका. यानंतर योजनेचा उपघटक निवडून तुमचा अर्ज सबमिट करा.

6) अर्ज सबमिट झाल्यानंतर रजिस्टर्ड मोबाईल नंबर वर संदेश मिळतो व सोबत अर्ज सबमिट झाल्याची पावती देखील मिळते.

Offline Application for Shelipalan karj Yojana | शेळीपालन कर्ज योजना 2022 साठी ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत

1) शेळीपालन कर्ज योजना 2022 साठी ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत जाणे आवश्यक आहे.

2) बँकेत शेळीपालन कर्ज योजना 2022 साठी उपलब्ध असलेला अर्ज तुम्हाला व्यवस्थित भरून त्याच बँकेत जमा करावा लागेल.

3) या व्यतिरिक्त तुमच्या गावातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जवळील पशुसंवर्धन खाते येथे देखील हा अर्ज उपलब्ध होऊ शकतो.

Rules And Regulations | शेळीपालन कर्ज योजना योजनेमधील महत्त्वाच्या अटी व नियम

सरकारी योजना म्हणजे नियम व अटी ओघाने येतातच.  सरकारच्या या शेळीपालन कर्ज योजनेसाठी देखील काही महत्त्वाच्या अटी व नियम आहेत.

1) शेळीफार्म उघडताना सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांना दोन लाख रुपये खर्च करावे लागतात.

2) लाभार्थी शेतकऱ्यांने या योजनेअंतर्गत एक लाख रुपयांचे कर्ज घेतल्यास त्याला एक लाख रुपयांचा धनादेश किंवा इतर कोणत्याही स्वरूपाचा दस्तऐवज देणे आवश्यक आहे.

3) अर्जदाराच्या शेळीपालन प्रकल्पात शेळीची किंमत व घर यांसारखी माहिती समाविष्ट असावी.

4) जे शेतकरी शेळीपालन करणार आहेत त्यांच्याकडे 100 शेळ्यांसोबत 5 बोकड ठेऊ शकतील यासाठी 9 हजार चौरस मीटर जमीन असणे आवश्यक आहे.

5) शेळ्यांची निगा व त्यांच्या चाऱ्याची योग्य व्यवस्था शेतकऱ्यांजवळ असायला हवी.

6) शेळीपालन कर्ज योजनेसाठी अर्ज करताना भाडे पावती व 9,000 चौरस मीटरचा नकाशा सादर करणे आवश्यक आहे.

Benifits Of Maharashtra Shelipalan Loan Yojana |  शेळीपालन कर्ज योजना योजनेचा होणारा फायदा

या योजनेमुळे ग्रामीण भागातील बेरोजगारांना अगदी कमी भांडवलात स्वतःचा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. शेळीपालन योजनेमुळे शेतकऱ्यांसाठी नवीन उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध होऊ शकतो. या योजनेमुळे शेळीपालनात वाढ होऊन राज्यात मांस व दुधाचा पुरवठा वाढेल. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. पारंपरिक शेती व्यतिरिक्त शेतकरी नव्या व्यवसायाकडे वळतील. यामुळे सरकारची ही योजना शेतकरी वर्गासाठी अधिक फायदेशीर ठरणार आहे.

महत्त्वाचे : महाराष्ट्र शेळीपालन योजनेचा अर्ज करताना या योजनेसाठी असणाऱ्या नियम व अटी तपासून बघा.याशिवाय कागदपत्रे व्यवस्थित जमा करा अन्यथा तुमचा अर्ज बाद केला जाऊ शकतो.

प्रश्न तुमचे उत्तर आमचे !

■ शेळीपालन कर्ज योजना 2022 म्हणजे नक्की काय ?

उत्तर : शेळीपालन कर्ज योजनेमार्फत राज्यसरकार शेळीपालन व्यवसाय करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करते. शेळीपालन करून शेळी फार्म उघडण्यासाठी महाराष्ट्र सरकार शेळीपालन कर्ज योजनेअंतर्गत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देते.

■ शेळीपालन कर्ज योजना का सुरू करण्यात आली ?

उत्तर: महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर शेळीपालन केले जाते. शेतकऱ्यांना शेती व्यतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत निर्माण व्हावा यासाठी पशुपालन व्यवसाय मदत करतो. यामुळे राज्यसरकारने ग्रामीण भागात पशुसंवर्धन व्यवसायास चालना देण्यासाठी शेळीपालन कर्ज योजना सुरू केली.   राज्यात शेळीपालनाचे क्षेत्र वाढवून दूध व मांस उत्पन्नात वाढ करणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.  शेळीपालनाची आवड असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने हा व्यवसाय सुरू करावा व जास्तीत जास्त पैसे कमवावे हा हेतुदेखील या योजनेमागे होता.

■ शेळीपालन शेड अनुदानासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा ?

उत्तर : शेळीपालन कर्ज योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करताना सर्वप्रथम योजनेसाठीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायला हवी. यासाठी http://mahamesh.co.in/  या संकेतस्थळावर जा. येथे वेबसाईटचे होम पेज दिसेल. यावर दिसणाऱ्या महामेश या पर्यायावर क्लिक करा. येथे तुम्हाला अर्जदार व लॉगिन चा पर्याय पहायला मिळेल. लॉगिन करताना अर्जदाराचा आधार क्रमांक टाकून कॅप्चा कोड टाका. लॉगिन झाल्यानंतर नवीन पेज उघडेल. याठिकाणी योग्य ती माहिती भरावी. माहिती भरल्यानंतर ती सेव्ह करायची विसरू नका. यानंतर योजनेचा उपघटक निवडून तुमचा अर्ज सबमिट करा. अर्ज सबमिट झाल्यानंतर रजिस्टर्ड मोबाईल नंबर वर संदेश मिळतो व सोबत अर्ज सबमिट झाल्याची पावती देखील मिळते.

■ शेळीपालन योजनेसाठी ऑफलाईन अर्ज कसा करावा ?

उत्तर : 1) शेळीपालन कर्ज योजना 2022 साठी ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत जाणे आवश्यक आहे.

2) बँकेत शेळीपालन कर्ज योजना 2022 साठी उपलब्ध असलेला अर्ज तुम्हाला व्यवस्थित भरून त्याच बँकेत जमा करावा लागेल.

3) या व्यतिरिक्त तुमच्या गावातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जवळील पशुसंवर्धन खाते येथे देखील हा अर्ज उपलब्ध होऊ शकतो.

■ शेळीपालन कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता निकष कोणते आहेत ?

उत्तर : 1) शेळीपालन कर्ज योजना 2022 या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकरी घेऊ शकतात.

2) यामध्ये शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.

3) शेळीपालन कर्ज योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना शेळी पालनाचा अनुभव असायला हवा.

4) स्वतःची जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

5) अनुसूचित जाती व जमातीच्या अर्जदारांना जात प्रमाणपत्र देणे बंधनकारक असणार आहे.

■ शेळीपालन कर्ज योजनेसाठी अर्ज करताना कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता भासते ?

उत्तर : आधारकार्ड , बँक पासबुक, मतदार ओळखपत्र, जमीन दस्तऐवज, पत्त्याचा पुरावा, वार्षिक उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो, जात प्रमाणपत्र, मोबाईल नंबर.

■ शेळीपालन योजना 2022 साठी अर्ज करताना काही नियम व अटी आहेत का ?

उत्तर : होय ! सरकारी योजना म्हणजे नियम व अटी ओघाने येतातच.  सरकारच्या या शेळीपालन कर्ज योजनेसाठी देखील काही महत्त्वाच्या अटी व नियम आहेत.

1) शेळीफार्म उघडताना सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांना दोन लाख रुपये खर्च करावे लागतात.

2) लाभार्थी शेतकऱ्यांने या योजनेअंतर्गत एक लाख रुपयांचे कर्ज घेतल्यास त्याला एक लाख रुपयांचा धनादेश किंवा इतर कोणत्याही स्वरूपाचा दस्तऐवज देणे आवश्यक आहे.

3) अर्जदाराच्या शेळीपालन प्रकल्पात शेळीची किंमत व घर यांसारखी माहिती समाविष्ट असावी.

4) जे शेतकरी शेळीपालन करणार आहेत त्यांच्याकडे 100 शेळ्यांसोबत 5 बोकड ठेऊ शकतील यासाठी 9 हजार चौरस मीटर जमीन असणे आवश्यक आहे.

5) शेळ्यांची निगा व त्यांच्या चाऱ्याची योग्य व्यवस्था शेतकऱ्यांजवळ असायला हवी.

6) शेळीपालन कर्ज योजनेसाठी अर्ज करताना भाडे पावती व 9,000 चौरस मीटरचा नकाशा सादर करणे आवश्यक आहे.

■ शेळीपालन योजनेचा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे ?

उत्तर : या योजनेमुळे ग्रामीण भागातील बेरोजगारांना अगदी कमी भांडवलात स्वतःचा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. शेळीपालन योजनेमुळे शेतकऱ्यांसाठी नवीन उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध होऊ शकतो. या योजनेमुळे शेळीपालनात वाढ होऊन राज्यात मांस व दुधाचा पुरवठा वाढेल. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. पारंपरिक शेती व्यतिरिक्त शेतकरी नव्या व्यवसायाकडे वळतील. यामुळे सरकारची ही योजना शेतकरी वर्गासाठी अधिक फायदेशीर ठरणार आहे.

■ शेळीपालन कर्ज योजनेत शेळ्यांच्या शेड साठी अनुदान मिळते का ?

उत्तर : शेळीपालन कर्ज योजनेअंतर्गत शेळ्यांच्या शेड साठी कर्ज भेटते.

या लेखातून आम्ही तुम्हाला शेळीपालन कर्ज योजना विषयी संपूर्ण माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. या सारख्याच नवनवीन आणि उपयुक्त माहितीचा लाभ घेण्याकरिता https://schemeofgovernment.com/ या संकेतस्थळाला अवश्य भेट देत राहा

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Sharing Is Caring

Leave a Comment