भारतीय टपाल विभागाची अपघात सुरक्षा विमा योजना २९९ आणि ३९९ रुपये

भारतीय टपाल विभागाची नवीन लाभदायी अपघात सुरक्षा विमा योजना, २९९ आणि ३९९ रूपयांच्या वार्षिक हप्तामध्ये १० लाखांपर्यंत विमा कवच! 

नमस्कार मंडळी! अलीकडच्या कोरोनाकाळमुळे आपल्या सर्वांना हेल्थ इन्शुरन्सची सर्वात मोठी गरज का आहे? हे चांगलंच माहिती झालं आहे. म्हणूनच आजकाल दवाखान्यात होणारा महागड्या मेडिकल खर्चासाठी सर्वांना हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा असतो मात्र महागडा विम्याचा हप्ता यामुळे बरेच जण आरोग्य विमा खरेदी करत नाही. जर महागडा विमा खरेदी करायचा असेल तर विम्याचा हप्ता देखील महागच असतो, म्हणून बहुतेक लोक टाळाटाळ करत असतात. 

अशाप्रकारे तुम्हीसुद्धा (हेल्थ इन्शुरन्स) आरोग्य विमा घेण्यासाठी टाळाटाळ करत असाल किंवा कमी हप्ताचा आरोग्य विमा शोधत असाल तर तुमची शोध मोहीम इथे नक्कीच थांबेल. कारण आपल्या भारतीय डाक विभाग म्हणजेच इंडियन पोस्ट ऑफिस विभाग हे आपल्याला केवळ २९९ आणि ३९९ या वार्षिक हप्ता मध्ये १० लाख रूपयांचा  आरोग्य विमा देत आहे. 

होय! भारतीय डाक विभाग म्हणजेच Indian Post Office आणि TATA Accidental Guard Policy यांच्या अंतर्गत देशातील सर्व गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबियांना अपघात सुरक्षा विमा मिळावा यासाठी सरकारने वार्षिक ३९९ आणि २९९ रुपयांमध्ये १० लाख रुपयांचा अपघात सुरक्षा विमा देत आहे. या अपघात सुरक्षा विमा योजनेचा लाभ देशातल्या सर्वसामान्य नागरीकांपर्यत पोहोचण्यासाठी भारत सरकारने प्रत्येक जिल्ह्यातील पोस्ट ऑफिसमध्ये या विमा योजनाची अंमलबजावणी केली आहे.  

आज आपण या लाभदायक अपघात सुरक्षा विमा योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.  

चला, तर मग ही सर्व योजना टप्प्याटप्प्याने पाहू – 

प्रमुख उद्दिष्ट – 

या अपघात सुरक्षा विमा योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे देशातील प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबीयांपर्यत किंवा नागरीकांपर्यत कमीत-कमी खर्चामध्ये अपघात आरोग्य विमा योजना देणे आणि प्रत्येक आरोग्य सुविधेचा लाभ घरा-घरांपर्यत पोहोचवणे हा आहे. 

एकूण पात्रता किंवा वयोमर्यादा – 

या विमा योजनेचा लाभ सर्वसाधारणपणे १८ ते ६५ वर्ष वयोगटातील प्रत्येक भारतीय नागरीकाला मिळु शकतो. जर का तुम्हाला पण, या भारतीय पोस्ट ऑफिस अंतर्गत हा अपघात सुरक्षा विमा काढायचा असल्यास तर फक्त या वयोमर्यादेचे पालन करावे लागेल. 

विम्याचे लाभ आणि सोयीसुविधा –

 • या पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना अंतर्गत वार्षिक रक्कम २९९ किंवा ३९९ रूपये भरून प्रत्येक सदस्याला १० लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळणार आहे. 
 • या योजनेत विमाधारक सदस्याचा अपघाती मृत्यू झाल्यास १० लाख रुपये देण्यात येतील.
 • किंवा विमाधारक सदस्यास कायमचे अपंगत्व आल्यास १० लाख रुपये देण्यात येईल. 
 • सर्व प्रकारचे अपघात, सर्पदंश, विजेचा शॉक, फरशीवरून घसरून पडून मृत्यू, पाण्यात पडून मृत्यू यांचा समावेश आहे. 
 • या विमा योजनेत दवाखान्याचा खर्च करण्यासाठी देखील ६० हजार रुपयांची मदत करण्यात येते
 • तसेच, विमाधारक सदस्यास दवाखान्यात दाखल केले असेल तर दाखल केलेल्या दिवसांपासून  १० दिवसांपर्यंत दररोज १००० रुपये प्रति दिवस देण्यात येतात.
 • विमाधारक सदस्यास ओपीडी खर्च हा ३०,००० रूपये देण्यात येतो.
 • तसेच, त्या विमाधारक सदस्याच्या कुटुंबियांना दवाखाना प्रवासासाठी २५,००० रुपये प्रवास खर्च म्हणून देण्यात येतो. 
 • त्याचबरोबर अंत्यसंस्कारासाठी 5000 रुपये खर्च देण्यात येतो.
 • आणि या अपघात विमा योजने अंतर्गत विमाधारक सदस्यांच्या जास्तीत जास्त २ मुलांच्या शिक्षणासाठी १ लाख रुपयांची मदत करण्यात येते.

Post Office Accident Insurance Scheme २९९ आणि ३९९ रुपये विमा योजना – 

पोस्ट ऑफिस अंतर्गत या अपघात सुरक्षा विमा योजनेत, दोन्ही विमा योजना एकंदरीत सारख्याच असून फक्त दोन बाबींचा फरक आहे, त्या पुढीलप्रमाणे आहेत

 • ३९९ त्या या अपघात सुरक्षा विमा योजनेत विमाधारक सदस्याच्या मृत्यूनंतर दोन मुलांच्या शिक्षणासाठी १ लाख रुपयांची मदत मिळू शकते. त्याचबरोबर अंत्यसंस्कार खर्च ५००० हजार रुपये, वाहतूक खर्च आणि प्रतिदिन १००० हजार रुपये या बाबींचा समावेश होतो.
 • तर २९९ रुपये या विमा योजनेत विमाधारकास शिक्षण खर्च, वाहतूक खर्च, अंत्यसंस्कार खर्च आणि प्रतिदिन १००० रुपये यासर्व गोष्टी लागू होत नाही. 

या योजनेसाठी अपात्रता यादी – 

 • साहसी खेळांमध्ये सहभागी असलेले ( बंजी जंपिंग, स्कींइग, रेसिंग, इत्यादी)
 • नौदल, लष्कर, हवाईदल आणि पोलीस दलातील व्यक्ती
 • आरोग्य संदर्भात असलेली कोणतीही पूर्व विद्यमान स्थितीत, आजार, अपंगत्व इत्यादींमुळे झालेला अपघात
 • उपचार करणारे डॉक्टर, जे स्वतः विमाधारक सदस्य असेल किंवा या योजनेमध्ये सहभागी असलेल्या कुटुंबाचा जवळचा सदस्य 
 • आत्महत्या, ड्रग्स, अल्कोहोल किंवा इतर मादक पदार्थांच्या सेवनाने झालेला अपघात 
 • कोणत्याही विषारी, स्फोटक किंवा इतर व्यवसायातील कर्मचारी
 • कोणत्याही ड्रायव्हिंग व्यवसायाशी संबंधित व्यक्ती
 • खाण कामगार आणि बांधकाम कामगार 
 • बाळंतपणामुळे किंवा गर्भधारणेमुळे होणारे कोणतेही नुकसान 
 • वैद्यकीय दृष्ट्या आवश्यक नसताना रुग्णालयात घेतलेला उपचार 
 • ( हाडांचा ठिसूळपणा) ऑस्टियो पोरोसिसमुळे होणारे कोणतेही नुकसान

विमा योजना कालावधी –

ही अपघात सुरक्षा विमा योजनेचा कालावधी एक वर्षाचा असून एक वर्षानंतर पुढे चालू ठेवण्यासाठी पुन्हा तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या विम्याची ठराविक वार्षिक रक्कम भरून नूतनीकरण करावे लागेल

अर्ज कसा करावा – 

या विमा योजनेत तुम्हालाही सहभाग घ्यायचा असल्यास, तर तुमचे इंडिया पोस्ट पेमेंट बॅकेत चालू खाते असणे आवश्यक आहे, जर का नसेल तर तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन नव्याने खाते उघडून या योजनेत सहभागी होऊ शकता.  

ह्या योजनेसोबत देशभरात लाखांच्यावर विमाधारक जोडले गेले आहे. कारण हि योजना TATA (AIG) ने सुरू केली असून, टपाल खात्याने त्यांच्याशी एकत्रित करार केला आहे. 

प्रश्न तुमचे उत्तर आमचे 

 • पोस्ट ऑफिस अपघात सुरक्षा विमा योजना म्हणजे काय ?

उत्तर  – 

भारतीय टपाल विभागाने  देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी नवीन योजना सुरू केली आहे. 299 आणि 399 रुपयांमध्ये ही नवीन अपघात सुरक्षा विमा योजना (Post office Accident Insurance Scheme) सुरू केलेली आहे. या योजनेंतर्गत 10 लाख रुपयांचे विमा कवच प्रदान करण्यात येणार आहे.  

 • या अपघात सुरक्षा विमा योजनेत सहभागी होण्यासाठी पात्रता काय आहे? 

उत्तर – 

वय वर्षे १८ ते ६५ या वयोगटातील प्रत्येक भारतीय नागरिक या अपघात सुरक्षा विमा योजनेत सहभागी होण्यासाठी पात्र आहे. 

 • या अपघात सुरक्षा विमा योजनेचे लाभ कोणते? 

उत्तर – 

 • अपघाती मृत्यू – १० लाख रुपये
 • कायमचे अपंगत्व – १० लाख रुपये
 • रुग्णालयाचा खर्च – ६०,००० रूपये
 • मुलांचा शिक्षणाचा खर्च –  १ लाख रुपये प्रति ( किमान २ मुले) 
 • ॲडमिट असेपर्यंत दररोज – १००० रुपये दहा दिवस
 • ओपीडी खर्च – ३० हजार रुपये
 • अपघाताने अपंगत्व आल्यास – १० लाख रुपये
 • कुटुंबाला रुग्णालय प्रवासखर्च – २५ हजार रुपये
 • अंत्यसंस्कार खर्च – ५००० रुपये 
 • या अपघात सुरक्षा विमा योजनेचा एकूण कालावधी किती आहे?

उत्तर –

या अपघात सुरक्षा विमा योजनेचा कालावधी एक वर्षाचा असून एक वर्षानंतर तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या विम्याची ठराविक वार्षिक रक्कम भरून नूतनीकरण करावे लागेल.  

 • या अपघात सुरक्षा विमा योजनेसाठी अर्ज कसा करावा? 

उत्तर –

या  इंडियन पोस्ट ऑफिस अपघात सुरक्षा विमा योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता, यासाठी स्वतः चे इंडिया पोस्ट पेमेंट बॅकेत चालू खाते असणे आवश्यक आहे, जर का नसेल तर तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन नवीन खाते उघडून या योजनेसाठी अर्ज करू शकता. तसेच, तुम्ही पोस्टमन किंवा पोस्ट कर्मचारी यांची देखील मदत घेऊ शकता.     

अधिक माहितीसाठी – 

इंडियन पोस्ट ऑफिस अपघात सुरक्षा विमा योजनेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी –

टोल फ्री हेल्पलाईन नंबर – 155299

https://www.ippbonline.com/

या लेखातून आम्ही तुम्हाला विमा योजना २९९ आणि ३९९ रुपये संपूर्ण माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. या सारख्याच नवनवीन आणि उपयुक्त माहितीचा लाभ घेण्याकरिता https://schemeofgovernment.com/ या संकेतस्थळाला अवश्य भेट देत राहा.

Sharing Is Caring

Leave a Comment