कृषी योजना । महाराष्ट्र शासन कृषी योजना 2021 22 । कृषी योजना २०२२ । कृषी योजना महाराष्ट्र । शेतकरी योजना लिस्ट |

कृषी योजना । महाराष्ट्र शासन कृषी योजना 2021 22 । कृषी योजना २०२२ । कृषी योजना महाराष्ट्र । शेतकरी योजना लिस्ट ।

नमस्कार मंडळी. महाराष्ट्र शासन कृषी योजना 2021 22 या लेखामध्ये आज आपण शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या विविध शेतकरी योजनांची माहिती घेणार आहोत. शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. अशावेळी अपुऱ्या माहितीमुळे शेतकरी बांधव काही योजनांचा लाभ घेऊ शकत नाही त्यामुळे त्यांचे प्रचंड नुकसान होते. हे नुकसान होऊ नये यासाठी निरनिराळ्या महाराष्ट्र शासन कृषी योजना 2021 22 आम्ही घेऊन आलो आहोत. यासोबतच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, आरटीई महाराष्ट्र प्रवेश प्रक्रिया अशा अनेक उपयुक्त महाराष्ट्र शासन योजनांची संपूर्ण माहिती सुद्धा तुम्हाला मिळेल.

महाराष्ट्र मधे सुरु असलेल्या महाराष्ट्र शासन कृषी योजना 2021 22 लिस्ट

1
शरद पवार ग्राम समृद्धी योजना (sharad pawar gram samridhi yojana)
2
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
3
माझी कन्या भाग्यश्री योजना
4
RTE Maharashtra Admission आरटीई महाराष्ट्र प्रवेश प्रक्रिया
5
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना
6
पीएम किसान एफपीओ (FPO) योजना
7
महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना
8
नाबार्ड डेअरी फार्मिंग योजना २०२२
9
शेततळे अनुदान योजना
10
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
11
एक शेतकरी एक डीपी योजना

1. शरद पवार ग्राम समृद्धी योजना (sharad pawar gram samridhi yojana)

गावांचा आणि खेड्यांचा विकास व्हावा यासाठी महाराष्ट्र सरकारने शरद पवार यांच्या नावाने शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना (sharad pawar gram samridhi yojana) सुरु केली. जनावरांचे राहणीमान सुधारावे आणि शेतकऱ्यांना रोजगार मिळावा हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. ऑनलाईन अर्ज करून कृषी योजना मध्ये या योजनेचा लाभ शेतकरी घेऊ शकतात. 

शरद पवार ग्राम समृद्धी योजना (sharad pawar gram samridhi yojana) अंतर्गत मिळणाऱ्या गोष्टींसाठीचे अनुदान 

  • गाई आणि म्हशींसाठी पक्का गोठा बांधणे

खेडेगावात जनावरांच्या गोठ्याची जागा ही ओबडधोबड असते यामुळे पावसाळयाच्या दिवसात गोठ्यातील जमिनीची नासधूस होते. अशावेळी ओल्या जमिनीवर बसल्याने जनावरांना विविध आजार होत असतात. यासाठी शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत सिमेंट काँक्रिटचा वापर करून पक्का गोठा बांधण्यासाठी अनुदान मिळणार आहे.

  • शेळीपालन शेड बांधणे 

ग्रामीण भागात शेळीपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. संपूर्ण कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या या व्यवसायात पैशांअभावी शेतकरी बांधव योग्य प्रकारे शेळ्यांना निवारा देऊ शकत नाही. यामुळे शेळ्यांच्यात संसर्गजन्य रोग पसरण्याची भिती असते. हे टळावे याकरिता शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत मागणी केलेल्या प्रत्येक कुटुंबास शेड बांधण्यासाठी अनुदान मिळणार आहे. 

  • कुक्कुट पालन शेड बांधणे 

कुक्कुट पालन नीटनेटके व्हावे या अनुषंगाने पक्की शेड बांधण्यासाठी अनुदान मिळणार आहे. 

शरद पवार ग्राम समृद्धी योजना (sharad pawar gram samridhi yojana) पात्रता 

महाराष्ट्रातील सर्व नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे २ किंवा २ पेक्षा अधिक जनावरे आहेत ते या योजनेसाठी पात्र आहेत.

 

2. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 

महाराष्ट्र शासनाने दि १३ एप्रिल २०१७ रोजी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना हे नाव बदलून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना असे केले. या आरोग्य सुविधे मार्फत महाराष्ट्रातील जनतेला अनेक गंभीर आजारांवरील उपचारासाठी पूर्णपणे निःशुल्क उपचार मिळवून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्यातील अनेक गोरगरीब शेतकरी कुटुंब शस्त्रक्रिया तसेच प्रत्यारोपण थेरपी यासारख्या महागड्या उपचारांचा पैशांअभावी उपचार घेत नाही. हीच बाब ओळखून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत गरीब कुटुंबाना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आहे. यामध्ये प्लास्टिक सर्जरी, हृदयविकार, कर्करोग यासोबतच गुढगा हिप प्रत्यारोपण तसेच बालरोग शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहे. या सर्व आजारांसाठी सरकारने राज्यातील शासकीय रुग्णालयांची निवड केली आहे. तेथे जावून राज्यातील कुटुंब महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेऊ शकतात. 

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना करिता मिळणारे अनुदान 

वेगवेगळ्या महागड्या उपचारांसाठी योजनेअंतर्गत रोख रकमेची मदत 

 लाभार्थी कुटुंबाला निवडीत शासकीय रुग्णालयात उपचारासाठी  २ लाख रुपये एवढी मदत केली जाईल. 

किडनी प्रत्यारोपणासाठी ३ लाख रुपये देण्यात येणार 

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना पात्रता 

अर्जदार महाराष्ट्राचा नागरिक असला पाहिजे ज्याचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी हवे. 

राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील ज्या नागरिकांकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल तसेच त्यांना २ पेक्षा जास्त मुले नसावीत. 

 

3. माझी कन्या भाग्यश्री योजना (महाराष्ट्र शासन कृषी योजना 2021 22)

महाराष्ट्र सरकारने स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना ही योजना सुरु केली. मुली या कुटुंबावर ओझे होऊ नये त्या सज्ञान होईपर्यंत त्यांच्या कुटुंबाना मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ मिळावे या उद्देशाने  माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र सरकारकडून राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत सरकारकडून ५०हजार रक्कम मुलीच्या बँक खात्यात जमा केली जाते. या योजनेचा लाभ घेण्याकरिता मुलीच्या जन्म नोंदणीनंतर ग्रामपंचायत किंवा नगरपालिका वा महानगरपालिकेतील अंगणवाडी सेविकांकडे अर्ज करावा. 

माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत मिळणारे अनुदान 

पात्रता मुलीच्या खात्यात सरकारकडून ५० हजार रुपये जमा केले जातील 

जर दोन मुली असतील तर प्रत्येकीच्या नवे २५ हजार / २५ हजार जमा केले जातील 

माझी कन्या भाग्यश्री योजना पात्रता 

पहिल्या मुलीच्या जन्मानंतर वर्षाच्या आत पालकाने नसबंदी करणे आवश्यक दुसऱ्या मुलीच्या जन्माच्या महिन्यांच्या आत नसबंदी करणे अनिर्वाय

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न . लाखाच्या वरचे नसावे

 

4. RTE Maharashtra Admission आरटीई महाराष्ट्र प्रवेश प्रक्रिया 

शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत (RTE ) वंचित घटकातील मुलांसाठी खासगी शाळांमध्ये  २५ टक्के एवढी जागा राखीव ठेवली जाते. RTE Maharashtra Admission आरटीई महाराष्ट्र प्रवेश प्रक्रिया माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बालकांना सुद्धा खाजगी शाळेत इतर मुलांप्रमाणे दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी या कायद्याची तरतूद शासनाने केली आहे. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिये मार्फत खासगी शाळांमध्ये RTE अंतर्गत अर्ज करावयाचा असतो

RTE Maharashtra Admission आरटीई महाराष्ट्र प्रवेश प्रक्रिया अंतर्गत मिळणारे अनुदान 

वंचित घटकातील अनुसूचित जाती जमातीतील (SC,NT,ST,OBC) बालकांसाठी खासगी शाळेत २५ टक्के जागा राखीव ठेवली जाते.

RTE Maharashtra Admission आरटीई महाराष्ट्र प्रवेश प्रक्रिया पात्रता 

पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असावे 

इयत्ता पहिले मध्ये प्रवेश घेताना विद्यार्थ्याचे वय वर्ष पूर्ण असावे.

 

5. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना

राज्यातील दुष्काळग्रस्त आणि कोरडवाहू शेतीचे प्रमाण मोठे आहे. पाण्याच्या अभावामुळे अनेक शेती ओस पडली असता शेती दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारने महाराष्ट्र नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना २०२२ सुरु केली. या योजनेअंतर्गत ठिबक सिंचन प्रकल्प, पाण्याचा पंप, तलावाचे शेत यासारखे शेती उपयुक्त प्रकल्पांचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे. नानाजी देशमुख कृषी योजना २०२२ योजनेची अंबलबजावणी करण्यासाठी शासनातर्फे कोरडवाहू शेतीची तपासणी केली जाणार. माती परीक्षण करून शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शनही केले जाणार आहे. कृषी योजना मध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवाना ऑनलाईन अर्ज करावा लागेल.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना मध्ये मिळणारे अनुदान 

बियाणे उत्पादन युनिट      पाण्याचा पंप 

ठिबक शिंचन प्रकल्प        शिंपड सिंचन  प्रकल्प 

तलावाचे शेत                   वर्मी कंपोस्ट युनिट 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना पात्रता 

लहान मध्यमवर्गीय महाराष्ट्रातील रहिवासी शेतकरी पात्र असेल

 

6. पीएम किसान एफपीओ (FPO) योजना

कृषी योजना २०२२ मधील शेतकऱ्यांमध्ये दलाली कमी करण्यासाठी तसेच त्यांना आर्थिक पाठबळ मिळावे या हेतूने पीएम किसान एफपीओ (FPO) योजना शासनाने चालू केली. या योजनेचा थेट लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे. शेतीला व्यवसायाचे स्वरूप प्राप्त व्हावे हा पीएम किसान एफपीओ (FPO) योजनेचा उद्देश आहे. यासाठी किमान ११ शेतकऱ्यांनी संघटित होऊन एखादी संस्था किंवा कंपनी स्थापन करण्याची आवश्यकता आहे. लाभधारी संघटित शेतकऱ्यांना तब्बल १५ लाखापर्यंतचे अनुदान शासनामार्फत मिळणार आहे. तीन वर्षात तीन हफ्त्यात हे पैसे खात्यात जमा होतील.

पीएम किसान एफपीओ (FPO) योजना अंतर्गत मिळणारे अनुदान 

स्थापन झालेल्या संघटनांना तीन हफ्त्यात १५ लाख रक्कम मिळणार 

शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठेची ओळख मिळेल

मध उत्पादनात मोठी भर होणार असल्याने नाफेडच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत थेट मधाची विक्री केली जाणार 

पीएम किसान एफपीओ (FPO) योजना पात्रता 

संघटित शेतकऱ्यांने भारतीय कंपनी ऍक्ट कायद्याअंतर्गत नोंदणी करणे अनिवार्य 

ईशान्य आणि डोंगराळ भागातील किमान १०० शेतकरी सदस्यांची आवश्यकता तसेच मैदानी भागात ३०० सदस्य संघटित होणे गरजेचे

 

7. महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना 

शेती करताना बरेच श्रम लागतात काही वेळेस यामुळे वेळही वाया जातो योग्य बाजारभाव मिळाल्याने श्रम आणि वेळ दोनही फुकट जाते. अशा वेळी शेतकरी बांधव खचुन जातात शेती करणं सोडून देतात. हीच बाब शासनाने लक्षात घेऊन महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना अंमलात आणली आहे. या योजनेचा उद्देश शेतीसाठी मानवी प्राणी शक्ती कमी करून नवनवीन कृषी यंत्रांचा वापर वाढविणे हा आहे. यामुळे शेती करीत लागणारा खर्च कमी होण्यास मदत होईल तसेच उत्पादनही वाढेल. महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना द्वारे लाभार्थ्यांना पॉवर टिलर, औषध फवारणी पंप, ट्रॅक्टर यासारखे अवजारे खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते. लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईवर ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे.

महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना मार्फत मिळणारे अनुदान 

स्वयं चलित यंत्र    औषध फवारणी पंप 

ऊस तोडणी यंत्र    ट्रॅक्टर 

पॉवर टिलर          पंपसेट 

महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना पात्रता 

अर्जदार राज्याचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक 

शेतकरी अनुसूचित जाती जमाती मधील असल्यास योग्य प्रमाणपत्र सादर करणे 

अर्जदाराच्या नावावर जमीन असणे अनिवार्य आहे

ट्रॅक्टर करीत अनुदान हवे असल्यास अर्जदाराच्या नावे ट्रॅक्टर खरेदीची नोंदणी असावी

 

8. नाबार्ड डेअरी फार्मिंग योजना २०२२ 

देशातील तसेच राज्यातील दुग्ध व्यवसायाचे प्रमाण वाढावे आणि अनेक बेरोजगार लोकांना स्वयंचलित रोजगार उपलब्ध करून द्यावा या उद्देशाने केंद्र सरकारने नाबार्ड डेअरी फार्मिंग योजना २०२२ सुरु केली. डेअरी फार्मिंग व्यवसायासाठी प्रबळ भांडवलाची आवश्यकता असते. एवढे भांडवल ग्रामीण भागातील शेतकरी उभे करू शकत नसल्याने त्यांना आर्थिक पाठबळ मिळावे हा नाबार्ड डेअरी फार्मिंग योजनेचा उद्देश आहे. या योजने अंतर्गत सरकार व्याजाशिवाय कर्ज उपलब्ध करून देते. गाई व म्हशींचे संगोपन, दूध काढणे, तुपाची निर्मिती करणे यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक यंत्र वापरून आपला व्यवसाय मोठा करावा यासाठी शून्य व्याजदरात हे कर्ज पुरविले जाते. ऑनलाईन अर्जाद्वारे या योजनेचा लाभ घेता येतो.

नाबार्ड डेअरी फार्मिंग योजना अंतर्गत मिळणारे अनुदान 

अर्जदाराने १३.२० लाखापर्यंत मशीन खरेदी केली असल्यास त्याला २५ टक्के म्हणजे .३० लाखपर्यंतचे अनुदान मिळणार 

लाभार्थी एससी (SC)(ST)एसटी जमाती मधील असल्यास हेच अनुदान .४० लाखापर्यंत मिळेल 

अर्जदारास पेक्षा कमी गायींनी डेअरी फार्मिंग चालू करावयाची असल्यास सरकार ५० टक्के अनुदानाची रक्कम बँक मध्ये जमा करेल उर्वरित रक्कम स्वतः शेतकऱ्याने बँकमध्ये जमा करावी 

नाबार्ड डेअरी फार्मिंग पात्रता 

कोणीही संघटित शेतकरी गट यासाठी पात्र असेल  

वैयक्तिक शेतकरी अर्ज करू शकतात  

डेअरी फार्मिंग कंपनी योग्य कागदपत्रांद्वारे अर्ज करू शकतील 

वैयक्तिक उद्योजक अतिरिक मशीन खरेदीसाठी सुद्धा बिनव्याजदराने कर्ज मिळवू शकतात  

 

9. शेततळे अनुदान योजना 

राज्यात कोरडवाहू शेती तसेच दुष्काळ ग्रस्त जमिनीचे प्रमाण वाढले आहे. पुरेसा पाऊस पडल्याने शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांची हीच पाण्याची समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकारने मागेल त्याला शेततळे अनुदान योजना २०२२ अस्तित्वात आणली. यामध्ये पाण्याचा प्रश्न मिटवा पाण्याअभावी शेतकऱ्याने शेती ओस टाकू नये असा प्रयत्न सरकारचा आहे. शेततळे अनुदान योजना २०२२ अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना शेततळे निर्माण करण्यासाठी सरकारकडून ५० टक्के अनुदान मिळणार. या योजनेकरिता दारिद्र रेषेखालील शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीची आत्महत्या झाली असेल अशा शेतकऱ्यांना पहिले प्राधान्य देण्यात येणार आहे. शेतकरी बांधव ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात

शेततळे अनुदान योजना मार्फत मिळणारे अनुदान 

शेततळे निर्मितीसाठी कमाल ५० हजार इतकी रक्कम शासनाकडून मिळणार उर्वरित खर्च जास्त असल्यास तो अर्जदाराने स्वतः करावयाचा आहे

शेतकऱ्यांचा गट असल्यास त्यांना सामुदायिक अनुदान घेता येईल 

शेततळे अनुदान योजना पात्रता 

अर्जदाराच्या नावावर .६० हेक्टर जमीन असावी 

यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा

 

10. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 

देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल व्हावे या अनुषंगाने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना २०२२ केंद्र सरकारने चालू केली. या योजनेद्वारे शेतकरी बांधव स्वतः फळबाग लागवड करून त्यातून आपला उदरनिर्वाह करू शकतात. देशात फळबाग लागवडीचे प्रमाण वाढले आहे तसेच यातून मिळणारे उत्पन्नही अधिक असते. या योजनेत बारमाही उत्पन्न देणाऱ्या पिकांचा समावेश केला आहे. शेतकरी बांधवाने सुपारी, नारळ, डाळींब, संत्रे यासारख्या निरनिराळ्या रोपांची लागवड करून ती रोपे जिवंत ठेवल्यास त्यांना १०० टक्के अनुदान शासना मार्फत मिळणार आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये तीन टप्यात शेतकऱ्यांना अनुदान मिळेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारकडे ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावा लागेल. निवडीत शेतकरी बांधव १०० टक्के अनुदानासहित भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना २०२२ चा लाभ घेऊ शकतात

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत मिळणारे अनुदान 

लाभार्थी शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदान मिळणार आहे. यामध्ये पहिल्या वर्षी ५० टक्के, दुसऱ्या वर्षी ३० टक्के तर तिसऱ्या वर्षी २० टक्के अशा तीन टप्यात अनुदानाचा लाभ घेता येईल

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना पात्रता 

अर्जदार कोकण विभागातील असल्यास फळबाग लागवडीकरिता कमीतकमी १० गुंठे तर जास्तीत जास्त १० हेक्टर जमीन असावी 

अर्जदार इतर विभागातील असल्यास कमीतकमी २० गुंठे मध्ये तर जास्तीत जास्त हेक्टर एवढ्या जमिनीत लागवड केलेली असावी 

दुसऱ्या तिसऱ्या टप्याचा लाभ घेण्यासाठी बागायती झाडांच्या जीवितेचे प्रमाण ९० टक्के असणे अनिर्वाय तर कोरडवाहू झाडांच्या जीवितेचे प्रमाण ८० टक्के असणे आवश्यक

 

11. एक शेतकरी एक डीपी योजना 

राज्यात शेतकरी बांधव आधुनेकतेकडे वळला असता विजेचे वापरण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसते. परंतु सतत वीज खंडित होणे, विजेच्या तारा मुद्दाम कापणे, वीज चोरणे यासारखे प्रकार वाढू लागले याच गोष्टींना आळा घालण्यासाठी शासनाने एक शेतकरी एक डीपी २०२२ ही योजना सुरु केली. यामुळे शेतकऱ्यांना जास्त व्होल्टेज लाईटचे नवीन कनेक्शन देण्यात येणार आहे. एक शेतकरी एक डीपी योजना या कृषी योजनेत शेतकऱ्यांना वैयक्तिक डीपी मिळणार असल्याने अखंडित वीज पुरवठा होणार. एक शेतकरी एक डीपी योजना यामध्ये ज्या शेतकऱ्यांची हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे त्यांना हजार रुपये खर्च करावा लागेल उर्वरित खर्च शासनातर्फे पुरविला जाणार. तसेच इतर मागासवर्गीय शेतकरी बंधूभगिनींसाठी हीच रक्कम ५००० रुपये एवढी करण्यात आली आहे उर्वरित खर्च शासन करणार. कृषी योजना २०२२ मध्ये एक शेतकरी एक डीपी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे

एक शेतकरी एक डीपी योजना अंतर्गत मिळणारे अनुदान 

प्रत्येक शेतकऱ्यास वैयक्तिक डीपी मिळणार 

डीपीसाठी फक्त हजार किंवा हजार एवढीच रक्कम भरावी लागणार उर्वरित खर्च शासन करणार 

एक शेतकरी एक डीपी योजना  पात्रता 

शेती अर्जदाराच्या नावे असणे बंधनकारक

 

वरील संपूर्ण माहितीद्वारे कृषी योजनांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याने घ्यावा असे आवाहन सरकार करीत असते. सरकार दरवर्षी नवनवीन योजनांची अंमलबजावणी करते. या लेखातून आम्ही तुम्हाला नवीन कृषी योजना २०२२ याची माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. या सारख्याच नवनवीन आणि उपयुक्त योजनांचा लाभ घेण्याकरिता https://schemeofgovernment.com/ या संकेतस्थळाला अवश्य भेट देत राहा


Sharing Is Caring

1 thought on “कृषी योजना । महाराष्ट्र शासन कृषी योजना 2021 22 । कृषी योजना २०२२ । कृषी योजना महाराष्ट्र । शेतकरी योजना लिस्ट |”

Comments are closed.