शेतीच्या विजबिलाची चिंता मिटवणारी ही योजना तुम्हाला माहित आहे का ? जाणून घ्या कुसुम योजना महाराष्ट्र 2022 बद्दल

नमस्कार मित्रांनो ! सरकार आपल्यासाठी कायम विविध योजना आखत असते पण बऱ्याचदा या योजनांबद्दल योग्य माहिती आपल्यापर्यंत पोहोचत नाही. यामुळे होणारे नुकसान देखील मोठे असते. तुमचे हे नुकसान होऊ नये यासाठी आम्ही आज तुम्हाला सरकारच्या एका नवीन योजने बद्दल माहिती देणार आहोत.

भारत हा शेतीप्रधान देश आहे. या देशातील महाराष्ट्रात पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. यामुळे येथे शेतीवर आधारित योजना मोठ्या प्रमाणात राबविल्या जातात. शेती व्यवसायाचा विकास व्हावा, शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे आणि गावांची प्रगती होऊन पर्यायाने राज्याची व देशाची देखील प्रगती व्हावी यासाठी या योजना आखल्या जातात. कुसुम योजना महाराष्ट्र 2022  ( Kusum Yojana Maharashtra) ही यातीलच एक योजना आहे.

Kusum Yojana Maharashtra 2022 | कुसुम योजना महाराष्ट्र 2022

पीएम कुसुम योजना 2022 ही केंद्र सरकारची योजना आहे. वित्तमंत्री अरुण जेटली यांनी ही योजना लॉन्च केली होती. कमीत कमी खर्चात शेतीसाठी सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबविण्यात आली. या योजनेचा फायदा घेऊन सुमारे 20 लाखापेक्षा अधिक शेतकरी नापीक जमिनीवर सौरपंपाचा वापर करून शेती करू शकतात.

Aim of कुसुम योजना महाराष्ट्र 2022 | योजनेची उद्दिष्टे

माफक दरात शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळवून देणारी ही योजना आहे. कृषी पंपाच्या साहाय्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी सर्व इतर विजेची उपकरणे हाताळता येतील. बऱ्याचदा अखंडित वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांची कामे वेळेवर होत नाहीत.अशावेळी शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी अखंडित वीजपुरवठा मिळावा आणि विजेच्या बाबतीत शेती व शेतकरी स्वयंपूर्ण व्हावा ( Independent farmer) या उद्देशाने कुसुम योजना महाराष्ट्र 2022 ची आखणी केली आहे.

Need of PM Kusum Yojana | कुसुम योजना महाराष्ट्र 2022 ची गरज

शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी वीज पंपाची आवश्यकता असते. परंतु अनेक ठिकणी शेतातील वीज पंपासाठी रात्री वीज उपलब्ध होते. यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतीचे सिंचन करावे लागते. अशावेळी सिंचन करताना शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. दिवसभर काम करून रात्री काम करावे लागते. याशिवाय रात्री शेतात जंगली जनावरांचा वावर अधिक असतो यामुळे जिवीत हानी देखील होऊ शकते. म्हणून शेतकऱ्यांना दिवसा कमी खर्चात वीज उपलब्ध करून देण्यासाठी एका व्यवस्थेची गरज होती. ही गरज पीएम कुसुम योजना महाराष्ट्र 2022 ने पूर्ण केली आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे आता सहज शक्य झाले आहे.

Highlights | कुसुम योजना महाराष्ट्र 2022 ची वैशिष्ट्ये

1) ही योजना मगाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांत राबविण्यात येणार आहे.

2) कुसुम योजने अंतर्गत विविध जिल्ह्यात 4

3814 कृषी पंपांची स्थापना करण्यात येईल.

3) यामध्ये विविध प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी लाभार्थी हिस्सा जाहिर करण्यात आला आहे.

4) शेतकऱ्यांच्या जमिनीनुसार वेगवेगळ्या क्षमतेचे सौर पंप उपलब्ध होतील.

5) या योजनेमुळे शेतकऱ्यांवरचा वीज बिलाचा बोजा देखील कमी होईल.

Kusum Solar Yojana Maharashtra Benifits | कुसुम योजनेचा शेतकऱ्यांना होणारा फायदा व लाभ

1) कुसुम योजनेद्वारे शेतकऱ्यांना सहज वीज पुरवठा प्राप्त होणार आहे.

2) या योजनेच्या यशस्वीतेमुळे शेतकऱ्यांवरचा वीज बिलाचा ताण कमी होईल.

3) अतिरिक्त सौर ऊर्जेमुळे शेतात होणारी कार्बन फुटप्रिंट कमी करण्यास यामुळे मदत होईल.

4) ही योजना शेतकऱ्यांना जोखीम मुक्त उत्पादन प्रदान करते.

5) यामुळे भूजल अतिरेक तपासणीची क्षमता सिद्ध होईल.

Eligibility | पीएम कुसुम योजनेसाठी पात्रता निकष

 • पीएम कुसुम योजनेसाठी ( PM kusum solar pump Yojana) अर्ज करणारा व्यक्ती हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
 • पाण्याचा शाश्वत स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील. यासाठी शेती शेजारी बोअरवेल, विहीर, बारमाही नदी, शेततळे असणे आवश्यक आहे.
 • पारंपरिक वीज कनेक्शन नसलेले शेतकरी या योजनेअंतर्गत अर्जासाठी पात्र असतील.
 • शेतकरी, सहकारी संस्था, शेतकऱ्यांचा गट, जल ग्राहक संघटना, शेतकरी उत्पादक संघटना हे या योजनेचे मुख्य लाभार्थी असतील

Important Documents for Kusum Yojana Maharashtra | आवश्यक कागदपत्रे

 • आधारकार्ड
 • रेशनकार्ड
 • बँक खाते तपशील
 • केवायसी कागदपत्रे
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • नोंदणी प्रत
 • मोबाईल क्रमांक

Online registration for कुसुम योजना महाराष्ट्र 2022 | ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया

कुसुम योजना महाराष्ट्र 2022 साठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर महाऊर्जाच्या वेबसाईटला भेट देणे आवश्यक आहे. यासाठी mnre.gov.in या वेबसाईटवर महत्त्वाची माहिती भरावी. पंतप्रधान कुसुम योजनेसाठी अर्जाची रक्कम प्रति मेगावॅट नुसार आकारली जाते. यामध्ये 0.5 मेगावॅट साठी रु. 2500 + जीएसटी, 1 मेगावॅट साठी रु. 5000+ जीएसटी, 1.5 मेगावॅट साठी रु.7,500+ जी एसटी , 2 मेगावॅट साठी रु 10,100 + जीएसटी असे मूल्य आकारले जाते.

Reason Behind Agricultural Projects | म्हणून राबविल्या जातात शेतीविषयक योजना

सरकार शेतीसाठी योजना का राबविते हा प्रश्न बहुतेक लोकांना पडलेला असू शकतो. पण खरं सांगायचं झालं तर स्वातंत्र्य नंतरच्या काळात भारतात खूप मोठे अन्न संकट निर्माण झाले होते. यावेळी भारत अन्न धान्यासाठी इतर देशांवर अवलंबून होता. यावेळी भारताला अन्न धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविणे या हेतूने त्यानंतर च्या जवळ जवळ सर्वच पंचवार्षिक योजनांमध्ये शेती व्यवसायाला महत्त्व देण्यात आले.याच काळात हरितक्रांती झाली आणि काही अंशी देश अन्न धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. यानंतर अशी परिस्थिती निर्माण होऊ नये. भारत कायम अन्न धान्याच्या बाबतीत सुरक्षित रहावा यासाठी आजही भारतात शेतीसाठी अनेक योजना राबविल्या जातात.

असा मिळणार लाभार्थी हिस्सा

कुसुम सौर पंप योजनेद्वारे राज्यातील 95 % शेतकऱ्यांना अनुदानासह सौर पंप पुरवले जातात. यामध्ये विविध प्रवर्गातील लोकांसाठी लाभार्थी हिस्सा जाहिर केला आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना  कृषी पंपात किंमतीच्या 10 टक्के तर अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना 5 टक्के लाभार्थी हिस्सा मिळणार आहे.

Alert for PM kusum yojana | या गोष्टींपासून सावधान राहणे आवश्यक

कुसुम योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी आधी अर्जाची फी भरावी लागते. परंतु मागच्या काही दिवसात असे दिसून आले आहे की बऱ्याच खोट्या वेबसाईट या योजनेच्या नावाखाली लोकांकडून पैसे घेत आहेत. म्हणून कुसुम योजनेच्या अधिकृत वेबसाईट शिवाय इतर कुठेही आर्थिक व्यवहार करू नयेत.

कुसुम सौर पंप योजना 2022 मार्फत या पद्धतीचे सौर पंप उपलब्ध होणार

 Kusum Yojana Magarashtra अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीनुसार सौर पंप मिळणार आहेत. यामध्ये 3 एचपी, 5 एचपी, 7.5 एचपी व त्यापेक्षा जास्त क्षमतेचे पंप उपलब्ध होणार आहेत. हे पंप टप्प्या टप्प्यानुसार वितरित होतील. जमिनी प्रमाणे वितरीत केल्या जाणाऱ्या पंपांची क्षमता खालील प्रमाणे

1) 2.5 एकर – 3HP DC

2) 5 एकर – 5 HP DC

3) 5 एकर पेक्षा जास्त- 7.5 HP DC

Important facts about कुसुम योजना महाराष्ट्र | कुसुम योजनेबाबत महत्त्वाची माहिती

Kusum yojana Maharashra 2022 या योजनेमुळे पुढील 25 वर्षे शेतकऱ्यांना सिंचनासाठी मदत होणार आहे. यासाठी सरकार कडून सौर पंप व सौर ऊर्जा उभारणीसाठी 30-30 % दराने अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये शेतकरी फक्त 40 % खर्चात सौर ऊर्जा पंप युनिट बसवू शकतो. यासाठी ते नाबार्ड,बँका व इतर संस्थांकडून खर्चाच्या 30 % कर्ज घेऊ शतकात. परंतु यासाठी 10% रक्कम शेतकऱ्याला स्वतः भरावी लागणार आहे.

Why kusum Yojana 2022 is Eco friendly goverment project ?  | प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरण पूरक योजना

सध्या भारतात प्रदूषण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर वीज तयार करताना होणारे प्रदूषण कमी होणार आहे. याशिवाय वीजनिर्मिती साठी वापरण्यात येणाऱ्या ऊर्जा साधनांचा मर्यादित वापर होईल. याशिवाय महत्त्वाचे म्हणजे वीज पंपासाठी लागणाऱ्या पेट्रोल डिझेल मुळे होणारे प्रदूषण यामुळे टाळता येणार आहे. यामुळे कुसुम योजना महाराष्ट्र ही पर्यावरण पूरक योजना आहे.

प्रश्न तुमचे उत्तर आमचे

1) कुसुम योजना महाराष्ट्र चे लाभार्थी कोण असतील ?

– शेतकरी, सहकारी संस्था, शेतकऱ्यांचा गट, जल ग्राहक संघटना, शेतकरी उत्पादक संघटना हे या योजनेचे मुख्य लाभार्थी असतील.

2) कुसुम योजना महाराष्ट्र 2022 साठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

 • आधारकार्ड
 • रेशनकार्ड
 • बँक खाते तपशील
 • केवायसी कागदपत्रे
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • नोंदणी प्रत
 • मोबाईल क्रमांक

3) किती मेगावॅट क्षमतेसाठी शेतकरी या योजनेद्वारे अर्ज करू शकतात.

– या योजने अंतर्गत शेतकरी 0.5 मेगावॅट ते 2 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी अर्ज करू शकतात. यासाठी प्रति मेगावॅट 2 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.

4) पीएम कुसुम सौर पंप योजना ही नक्की कोणामार्फत राबविली जाते ?

-केंद्र व राज्य शासना मार्फत ही कुसुम योजना महाराष्ट्र राबविली जाते.

5) kusum yojana maharashtra साठी कसा अर्ज करावा.

– Kusum Yojana Maharashtra 2022 साठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर महाऊर्जाच्या वेबसाईटला भेट देणे आवश्यक आहे. यासाठी mnre?gov.in या वेबसाईटवर महत्त्वाची माहिती भरावी. पंतप्रधान कुसुम योजनेसाठी अर्जाची रक्कम प्रति मेगावॅट नुसार आकारली जाते. यामध्ये 0.5 मेगावॅट साठी रु. 2500 + जीएसटी, 1 मेगावॅट साठी रु. 5000+ जीएसटी, 1.5 मेगावॅट साठी रु.7,500+ जी एसटी , 2 मेगावॅट साठी रु 10,100 + जीएसटी असे मूल्य आकारले जाते.(Online registration for Pm Kusum solar pump yojana )

6) कुसुम योजनेचा शेतकऱ्यांना नक्की काय फायदा होणार ?

– 1) कुसुम योजनेद्वारे शेतकऱ्यांना सहज वीज पुरवठा प्राप्त होणार आहे.

2) या योजनेच्या यशस्वीतेमुळे शेतकऱ्यांवरचा वीज बिलाचा ताण कमी होईल.

3) अतिरिक्त सौर ऊर्जेमुळे शेतात होणारी कार्बन फुटप्रिंट कमी करण्यास यामुळे मदत होईल.

4) ही योजना शेतकऱ्यांना जोखीम मुक्त उत्पादन प्रदान करते.

5) यामुळे भूजल अतिरेक तपासणीची क्षमता सिद्ध होईल.

 

या लेखातून आम्ही तुम्हाला कुसुम योजना महाराष्ट्र योजनेची संपूर्ण माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. या सारख्याच नवनवीन आणि उपयुक्त योजनांचा लाभ घेण्याकरिता https://schemeofgovernment.com/ या संकेतस्थळाला अवश्य भेट देत राहा.

Sharing Is Caring

Leave a Comment